Uttarakhand Tunnel 
देश

Uttarakhand Tunnel: बचावकार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचा सन्मान! उत्तराखंड सरकारकडून बक्षीस जाहीर

उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सुखरुप बाहेर काढण्यात आले. गेल्या १७ दिवसांपासून हे मजूर बोगद्यामध्ये अडकले होते

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सुखरुप बाहेर काढण्यात आले. गेल्या १७ दिवसांपासून हे मजूर बोगद्यामध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अनेकांचं योगदान आहे.

या पार्श्वभूमीवर बचावकार्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. (Uttarakhand CM Pushkar Singh Dhami has announced incentive amount of Rs 50000 each all the personnel working in the rescue operation inside the Silkyara tunnel)

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्यामध्ये गुंतलेला प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ५० हजार प्रोत्साहन भत्त्याची घोषणा केली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर, केंद्रीय एजेन्सी आणि इतर काही संस्थांच्या लोकांनी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल ४०० तासानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांना मोकळ्या आकाशात श्वास घेता आला.

१२ नोव्हेंबर रोजी सिल्क्यारा बोगद्यात काम करत असताना काही भाग कोसळला. त्यामुळे आतमध्ये काम करणारे ४१ कर्मचारी आतमध्ये अडकले. त्यांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले. अमेरिकेकडून मागवण्यात आलेल्या ऑगर मशिनच्या साहाय्याने सुरुवातील खोदकाम सुरु करण्यात आले होते. पण, कंपनामुळे काही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच मशिनमध्ये अनेकदा बिघाड निर्माण झाला होता.

रॅट होल मायनिंगच्या पद्धतीने खोदकाम करण्याचा निर्णय त्यानंतर घेण्यात आला. त्यासाठी मध्य प्रदेशातील १२ जणांच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. अखेर त्यांनी ही मोहीम फत्ते केली. ४१ कामगारांना एक-एक करुन बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट करुन कामगार आणि बचावकार्यात सहभागी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT