kumbh mela 
देश

'कुंभमेळा आणि मरकजची तुलना नकोच'

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच हरिद्वार इथं कुंभमेळा सुरु असून शाही स्नान होत आहेत. यामध्ये लाखो साधू, महंत आणि भाविक सहभागी होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघनही होत आहे. गेल्या वर्षी कमी रुग्ण संख्या असतानाही मरकजच्या आय़ोजनावरून बराच गोंधळ झाला होता. त्यामुळे देशातील कोरोनाचा संसर्ग आणि मरकज, कुंभमेळा यांची तुलना केली जात आहे. यावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मंगळवारी म्हटलं की, हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाशी कुंभ मेळ्याची तुलना केली जाऊ नये. मरकज हा कार्यक्रम बंद जागी झाला होता आणि त्यामध्ये परदेशातील लोकांनीही सहभाग घेतला होता. हिंदूस्तान टाइम्सशी बोलताना रावत यांनी सांगितलं की, कुंभभेळा आणि मरकज यामध्ये कोणतीही तुलना होऊ नये. कुंभमेळ्याला मरकजशी जोडू नये. मरकज हा एका बंद जागेत झालेला कार्यक्रम होता. तर कुंभमेळा हा मोठ्या ठिकाणी उघडपणे आणि खूप मोठा असा सोहळा आहे. कुंभमेळ्यात होत असलेल्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट आणखी वेगाने पसरणार नाही का असा प्रश्न मुख्यमंत्री रावत यांना विचारण्यात आला होता.

रावत यांनी कुंभमेळा आणि मरकज यामध्ये असलेला फरक सांगितला आहे. तसंच त्यांनी म्हटलं की, कुंभमेळ्यात सहभागी होणारे भाविक हे बाहेरचे नाहीत तर आपलेच आहेत. तर मरकज झाला तेव्हा कोरोनाबाबत कोणतीही जनजागृती झाली नव्हती. तसंच त्यावेळी कोणतीही नियमावली नव्हती. तेव्हा मरकजमध्ये सहभागी झालेले लोक किती काळ बंद जागी होते हेसुद्धा माहिती नव्हतं. आता कोरोनाबाबत लोकांना माहिती आहे आणि त्यापासून सुरक्षित कसं रहायचं यासाठीची नियमावलीसुद्धा माहिती आहे. 

कुंभमेळा हा बारा वर्षातून एकदा येतो आणि हा लाखो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. कोरोनाच्या संकटात नियमांचे कडक पालन होईल आणि यशस्वीपणे सोहळा पार पाडणं हेच आमचं ध्येय असल्याचं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. रावत म्हणाले की, लोकांच्या आरोग्याला प्राधान्य आहे मात्र श्रद्धेकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाच्या संसर्गामध्ये वेगाने वाढ होतेय यात काहीच शंका नाही मात्र आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुंभमेळ्यात 10 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल 1 हजार 86 इतकी आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासात एकूण 1925 नवीन रुग्ण सापडले. यात डेहराडूनमध्ये 775, हरिद्वारमध्ये 594 नव्या रुग्णांचा समावेश आहे. 12 एप्रिलला दुसऱ्या शाही स्नानासाठी जवळपास 30 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. हरिद्वारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 66 हजार 203 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT