trivendra singh ravat 
देश

उत्तराखंडमध्ये राजकीय भूकंप होणार; CM त्रिवेंद्र सिंह यांच्या राजीनाम्यानंतर कोण? हालचालींना वेग

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून - उत्तराखंडमध्ये राजकीय संकट ओढावलं असून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे नेते धन सिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. धन सिंह रावत श्रीनगरहून डेहराडूनला पोहोचले आहेत. घाईगडबडी धन सिंह रावत यांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं होतं. डेहराडूनला आल्यानंतर धन सिंह रावत थेट मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री मदन कौशिक हेसुद्धा त्यांच्यासोबत आहेत.

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या कामाच्या पद्धतीबाबत भाजप आमदारांमध्ये नाराजी असल्यानं नेतृत्वबदलाची तयारी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्रिवेंद्र सिंह रावत राजीनामा देण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्याआधी ते पत्रकार परिषद घेणार असल्याचंही सागंण्यात येत आहे. 

भाजप आमदार मुन्ना सिंग चौहान यांनी सांगितलं की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा सुरु आहे. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची सोमवारी भेट घेतली. त्यांना पक्षाच्या प्रमुखांकडून फोनही आला होता. भाजपचे सर्व 57 आमदार मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. 

त्रिवेंद्र सिंह रावत हे कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात. यावरून राज्यात राजकीय उलथापालथ सुरु आहे. सीएम रावत यांनी पहिल्यांदाच आमदार बनलेल्या धन सिंह रावत यांचे नाव सुचवले आहे. यामुळेच धन सिंह रावत हे घाईने डेहराडूनला पोहोचले आहेत. याशिवाय राज्यात एक उपमुख्यमंत्री असणार आहे. यासाठी पुष्कर सिंह धामी यांचे नाव आघाडीवर आहे. सायंकाळी चारच्या सुमारास त्रिवेंद्र सिंह रावत राज्यपालांची भेट घेतील. याचवेळी ते राजीनामा देतील असं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT