देश

Uttarakhand Exit Poll : भाजप, काँग्रेसमध्ये चढाओढ; आप ठरणार किंगमेकर?

सूरज यादव

उत्तराखंडच्या निवडणुकीत ७० जागांसाठी मतदान झाले असून १० मार्चला निकाल लागणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली असून एक्झिट पोल समोर येत आहेत. यामध्ये न्यूज एक्सने उत्तराखंडचा एक्झिट पोल जाहीर केला असून यामध्ये काँग्रेसला ३३ ते ३५ जागा तर भाजपला ३० ते ३३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आम आदमी पक्ष जास्ती जास्त ३ जागा जिंकू शकतो असं म्हटलं आहे. एक्झिट पोलचे आकडे पाहता यामध्ये आम आदमी पार्टीने ३ जागा जिंकल्यास राज्यात किंगमेकरच्या भूमिकेतही ते पहायला मिळू शकतात.

उत्तराखंडमध्ये १३ जिल्ह्यातील ७० विधानसभा मतदारसंघात १४ फेब्रुवारी रोजी मतदान झालं. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली असून ६२ टक्के मतदान झालं आहे. २०१७ मध्ये उत्तराखंडमध्ये ६५.५६ टक्के मतदान झालं होतं. उत्तराखंडमधील ही पाचवी विधानसभा निवडणूक आहे. आधीच्या चार निवडणुकांमध्ये दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपचं सरकार सत्तेत आलं होतं.

२०१७ मध्ये भाजपने विक्रमी जागा जिंकून सत्ता मिळवली होती. यावेळी पुन्हा भाजप सत्तेत आल्यास पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला उत्तराखंडमध्ये सलग सत्ता मिळेल.उत्तराखंडमध्ये भाजपने पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केलं आहे. २०१७ मध्ये भाजपने उत्तराखंडमध्ये ७० पैकी ५६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ११ जागा राखता आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

IND vs WI 3rd ODI: भारतीय संघात अचानक बदल, CSK च्या स्टार खेळाडूला बोलावलं; तिसऱ्या वन डेत Playing XI मध्ये बदल निश्चित

रस्त्याने चालताना अघटित घडलं! बंद गोदामाच्या बाल्कनीचा भाग थेट पादचाऱ्यावर कोसळला, साकीनाक्यातील थरारक घटना CCTVत कैद

Googleचा नवा AI ‘Gemini 4 Argon’ लॉन्च; कोडिंगपासून सायबरसुरक्षेपर्यंत करणार मदत, जाणून घ्या किंमत

ROHIT SHARMA: ‘पुन्हा तीच भावना अनुभवायची आहे...’; २०२७ वर्ल्ड कपआधी रोहित शर्माचा मोठा खुलासा, शुबमन गिलच्या कॅप्टन्सीवरही बोलला

SCROLL FOR NEXT