

Sakinaka Warehouse Balcony Collapsed
ESakal
मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. साकीनाका येथील एका बंद गोदामाच्या बाल्कनीचा काही भाग अचानक कोसळल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.