देश

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Uttarakhand Forest Fire News : उत्तराखंडमधील जंगलात शनिवारी लागलेले वणवे नियंत्रणात आणण्याचे काम रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

सकाळ वृत्तसेवा

डेहराडून, ता. २८ (पीटीआय) : उत्तराखंडमधील जंगलात शनिवारी लागलेले वणवे नियंत्रणात आणण्याचे काम रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. भारतीय हवाई दलाच्या मदतीने अनेक भागांमधील वणव्यांवर नियंत्रण मिळविले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वणव्यांमुळे आतापर्यंत ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक झाली आहेत.

नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर या गावांच्या लगतच्या जंगलांमध्ये वणव्यांचे स्वरूप तीव्र होते. त्यामुळे हवाई दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी याच भागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. शनिवारपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आज आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरीही काही भागांमध्ये अद्याप वणवे धुमसत आहेत. नरेंद्रनगर वनविभागाअंतर्गत येणाऱ्या माणिकनाथ डोंगररांगेत पेटलेले वणवे पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आले असून नैनिताल आणि लगतच्या जंगलातील वणव्यांवर बहुतांशी नियंत्रण मिळविले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही या भागाची हवाई पाहणी केली.

अग्निशमन दलाच्या मदतीसाठी हवाई दलाने एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टर तैनात केले असून लष्कर आणि प्रांतीय रक्षक दलाचे जवानही मदतकार्यात सहभगी आहेत. जंगलांच्या लगतच्या गावांमधील नागरिकांना जंगलांपासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, नव्याने वणवा पेटल्याचे निदर्शनास येताच वनविभागाला तातडीने कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT