uttarakhand flood sakal
देश

Uttarakhand Flood : उत्तराखंडमध्ये पुरामुळे चौघांचा मृत्यू; १५ बेपत्ता

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी परिस्थितीचा आढावा घेत बचावकार्याचा वेग वाढविण्याची सूचनाही केली

सकाळ वृत्तसेवा

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावरील गौरीकुंडजवळील दात पुलिया येथे मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे चौघांचा मृत्यू झाला, तसेच इतर पंधरा जण बेपत्ता झाले. तर तीन दुकानेही वाहून गेली.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी परिस्थितीचा आढावा घेत बचावकार्याचा वेग वाढविण्याची सूचनाही केली. दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

रुपनगरचे जिल्हा दंडाधिकारी सौरभ गहरवार यांनी सांगितले, गौरीकुंडजवळ पुरात चौघांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढले असून बेपत्ता असलेल्या पंधराजणांचा शोध सुरू आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून मदत व बचावकार्य राबविले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT