Uttarkashi Tunnel Accident Esakal
देश

Uttarkashi Tunnel Accident: १६ दिवसांपासून मजूर अडकलेलेच! आता बोगद्याच्यावरून खोदकाम सुरू; अडथळे न आल्यास...

उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजूरांच्या सुटकेसाठी अद्याप शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजूरांच्या सुटकेसाठी अद्याप शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या १५ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी रविवारी व्हर्टिकल ड्रिलिंगही सुरू करण्यात आले आहे. कोणतेही अडथळे न आल्यास, सर्व कामगार दोन दिवसात बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच वेळी, 800 मिमी पाईपमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनचे ब्लेड प्लाझ्मा आणि हैदराबाद येथून आणलेल्या लेझर कटरने कापले जात आहे.

पाईपमधील मशिनचा ढिगारा हटवल्यानंतर हाताने खोदकामही सुरू करण्यात येणार आहे. पाईपद्वारे बांधण्यात येत असलेल्या मार्गात फक्त 10 मीटर खोदकाम बाकी आहे, त्यानंतर कामगारांपर्यंत पोहोचता येईल.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लि. मॅनेजिंग डायरेक्टर महमूद अहमद यांनी सिल्क्यारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत 24 मीटर उभ्या ड्रिलिंगचे काम केले गेले आहे आणि एकूण 86 मीटर खोदणे बाकी आहे. बोगद्याच्या वरच्या आणि इतर टोकांना सुरू असलेल्या कामाला गती देण्यासाठी आणखी टीम्सना पाचारण करण्यात आले आहे. तर आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून ओएनजीसीचे एक पथक आले आहे.

मॅन्युअल ड्रिलिंगसाठी सैन्य पोहोचले: मद्रास सॅपर्सचे एक युनिट, भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी कॉर्प्सचे एक गट, बचाव कार्यात मदत करण्यासाठी रविवारी सिल्क्यारा येथे पोहोचला आहे. त्यात 30 लष्करी कर्मचारी आहेत, जे नागरिकांसोबत हात, हातोडा यांनी बोगद्यातील मलबा बाहेर काढतील. त्यानंतर पाईप त्याच्या आत पुढे ढकलले जाईल. हवाई दलही मदत करण्यात गुंतले आहे. हवाई दलाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून अनेक महत्त्वाची उपकरणे पाठवली आहेत.

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपर्यंत लवकरच पोहोचण्याची आशा आहे. चार मार्गांनी कामगारांपर्यंत पोहोचण्याचे काम रविवारपासून सुरू झाले आहे. पाईपमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनचे ब्लेड हैदराबादच्या लेझर कटरने आणि चंदीगडच्या प्लाझ्मा कटरने कापले जात आहे. आता या मार्गावर मॅन्युअल ड्रिलिंग होणार आहे. बोगद्याच्या वरून आणि इतर टोकांना ड्रिलिंगसाठी आणखी टीम्सना पाचारण करण्यात आले आहे.

आजपासून हाताने खोदकाम सुरू

नोडल अधिकारी डॉ. नीरज खैरवाल यांनी सांगितले की, ऑगर मशीनचे उर्वरित १३.९ मीटर ब्लेड कापण्याचे काम रात्रभर सुरू राहणार आहे. सोमवारपासून हाताने खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.

पावसामुळे त्रास होऊ शकतो

हवामान खात्याने सोमवारी उत्तराखंडमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पाऊस पडल्यास बचावकार्यात व्यत्यय येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

Jalgaon News : पोळा सणावर लम्पी आजाराचे सावट; बैलांच्या शर्यतीवर बंदी, घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

SCROLL FOR NEXT