देश

Uttarkashi Tunnel Collapse: उत्तर काशीमध्ये बोगद्याचा भाग कोसळला, अडकलेल्या ४० मजुरांना वाचविण्यासाठी मदतकार्य सुरू

ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा आणि डंडालगाव यांच्यादरम्यान बांधण्यात येत असलेल्या एका बोगद्याचा काही भाग आज कोसळला.

सकाळ डिजिटल टीम

Uttarkashi Tunnel Collapse Rescue: ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा आणि डंडालगाव यांच्यादरम्यान बांधण्यात येत असलेल्या एका बोगद्याचा काही भाग आज कोसळला. त्यामुळे बोगद्यात किमान ४० कामगार अडकले आहेत. आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. भूस्खलनामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिस आणि ‘एनडीआरएफ’च्या पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याची माहिती उत्तरकाशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी दिली. आतमध्ये अडकलेल्या मजुरांना ऑक्सिजन मिळत राहावा यासाठी बोगद्याचा जो भाग कोसळला आहे, त्या भागातून ऑक्सिजनचा पाइप आतमध्ये सोडण्यात आला आहे, असेही यदुवंशी यांनी सांगितले.

‘चार धाम’साठी विशेष प्रकल्पांतर्गत नवे रस्ते बांधण्यात येत आहेत. त्या प्रकल्पाचा एक भाग म्हणूनच हा रस्ता तयार करण्यात येत आहे. या बोगद्यामुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री हे अंतर २६ किलोमीटरने कमी होणार आहे.

सीमा रस्ते बांधणी संघटना आणि ‘आयटीबीपी’ची पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत. कमांडिंग अधिकारी नमन नरुला आणि असिस्टंट कमांडंट वैभव जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. (latest Marathi News)

स्थानिक परिस्थिती पाहता मजुरांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.बोगद्याच्या बाहेर पाच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक उपचारांसाठी वैद्यकीय पथकही तेथे बोलावण्यात आले आहे. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाचे चीफ जनरल मॅनेजर विशाल गुप्ता आणि ‘एनडीएरएफ’चे उपप्रमुख रविशंकर बधानीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हेही बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. (latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT