Uttarkashi Tunnel Collapse Esakal
देश

Uttarkashi Tunnel Collapse: बोगद्यात अडकलेल्या मजूरांना वाचवण्यासाठी येणार 'हे' खास मशीन; आज पूर्ण होणार ऑपरेशन?

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. ऑपरेशन तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. अद्याप, मजुरांना बोगद्याबाहेर काढण्यात यश आलेलं नाही. यमुनोत्री हायवेवर धरासू-बडकोटच्या बोगद्यामध्ये मजूर अडकले असून त्यांना वाचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आता त्यांना वाचवण्यासाठी आधुनिक तत्रांचा वापर करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असून आज (बुधवारी) कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, असे तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

खराब झालेल्या ऑगर मशिनच्या जागी आता ड्रिलिंगसाठी दिल्लीहून अत्याधुनिक मशीन मागवण्यात येत आहे. या मशिन हवाई दलाच्या मदतीने घटनास्थळावर पोहोचवल्या जातील. मदत आणि बचाव कार्याचे नेतृत्व करणारे कर्नल दीपक पाटील म्हणाले की, ड्रिलिंगसाठी अमेरिकन बनावटीचे नवीन ऑगर मशीन मागवले जात आहे. जे वेगाने काम करेल. आता या संपूर्ण मदत आणि बचाव कार्यात मिलिटरी ऑपरेशन टीमही सक्रिय झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडेल- डॉ. सिन्हा

डॉ. सिन्हा म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने बोगद्यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. याशिवाय त्यांना सुखरूप बाहेर काढले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. ते म्हणाले, आम्ही हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडू याविषयी कुणालाही शंका नसावी.

दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाच्याही सतत संपर्कात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन सचिव डॉ.सिन्हा यांनी सांगितले आहे. जी काही प्रगती आणि कार्यवाही सुरू आहे, त्याची माहिती केंद्रालाही दिली जात आहे. गृह मंत्रालयाचे अधिकारी संपूर्ण कारवाईवर सतत लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT