Uttarkashi Tunnel 
देश

Uttarkashi Tunnel Collapsed: "अडकलेले कामगार घरी परतणारच"; आंतरराष्ट्रीय टनेल एक्स्पर्टनं दिला विश्वास

कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Uttarkashi Tunnel Collapsed: उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथं काम सुरु असलेला बोगदा कोसळल्यानं त्यात ४१ जण अडकून पडले आहेत. आज दहा दिवस झाले तरी त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही, पण यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं आहे. या तज्ज्ञांनी हे सर्व अडकलेले कामगार सुखरुप घरी पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांचा सहभाग

आंतरराष्ट्रीय टनेल तज्ज्ञ प्रा. अर्नोल्ड डिक्स हे सध्या उत्तरकाशी इथं या बचाव मोहिमेत सहभागी आहेत. त्यांनी म्हटलं की, "बचाव पथकाकडं या सर्व कामगारांना सुखरुप त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बचावाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. (Latest Marathi News)

बचाव पथकानं आत्तपर्यंत खूपच चांगलं काम केलं आहे. यांपैकी 900 पाईपलाईन्स हा एक पर्याय होता. या व्यतिरिक्त आज सकाळी आम्हाला दुसरा पर्यायही मिळाला. पण यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यानं आम्ही विविध बचाव मोहिमा राबवत आहोत.

बचाव पथकानं शोधले अनेक पर्याय

यामध्ये 'मिशन फ्रॉम टॉप', 'मिशन फ्रॉम फ्रन्ट' आणि 'मिशन फ्रॉम साईड' असे पर्यायही शोधण्यात आले आहेत. फक्त आम्ही सध्या सांगू शकत नाही की ते नेमके कुठल्या दरवाज्यातून बाहेर येतील. आम्ही सध्या बोगद्याचा वरचा दरवाजा ठोठावला आहे. (Marathi Tajya Batmya)

त्याचबरोबर इतरही सर्व दरवाजे आम्ही तपासून पाहत आहोत. पण यांपैकी कुठला उघडेल याबाबत सध्या खात्री देऊ शकत नाही. वरच्या बाजूनं ड्रिलिंगसाठी आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही जागा सिल्क्यारा बोगदाच्या वरच्या बाजुला आहेत.

सर्व कामगार सुखरुप बाहेर येणार

प्रा. डिक्स हे या बचाव मोहिमेत लिडिंग एक्सर्प्ट म्हणून काम पाहत आहेत. तसेच या बचाव मोहिमेतून सर्व ४१ कामगारांना वाचवण्याची खात्री व्यक्त केली आहे. जेव्हा मी घटनास्थळी दाखल झालो तेव्हा मला माहिती दिली गेली की, ४१ पुरुष या बोगद्यात अडकून पडले आहेत. यामध्ये इतर कोणालाही इजाही होणार नाही, असा विश्वास त्यांनी केला.

एन्डोस्कोपी कॅमेरॅनं घेतला शोध

आज सकाळी बचाव पथकानं बोगद्यामध्ये एन्डोस्कोपीच्या कॅमेरॅच्या सहाय्यानं आतमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला याचं यशस्वी चित्रिकरणही झालं. या सर्व ४१ कामगारांना या बोगद्यात हालचालींसाठी पुरेशी स्पेस उपलब्ध असल्याचंही यातून समोर आलं आहे, असंही प्रा. अर्नोल्ड डिक्स यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

SCROLL FOR NEXT