Uttarkashi Tunnel Rescue 
देश

Uttarkashi Tunnel Rescue: सर्व कामगारांना वाचवल्यानंतर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले आता बोगद्याचं...

पहिल्यांदाच अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानं त्यातून बरंच काही शिकायला मिळालं, असंही ते म्हणाले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ कामगारांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की मी पूर्णपणे सुखावले आहे आणि आनंदी आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानं त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. (Uttarkashi Tunnel Rescue Nitin Gadkari first reaction after rescuing all the workers)

गडकरी ट्वीट करुन म्हणाले, सिल्क्यारा बोगद्यातील दुर्घटनेमुळं अडकलेले ४१ जण बाहेर आले आणि त्यांचा जीव वाचला ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. सर्व एजन्सीजनं पीएमओच्या मार्गदर्शनाखाली सरकारच्या सर्व एजन्सीज, उत्तराखंडच्या एजन्सीज तिथली स्थानिक जनता आणि सर्वांनी दिवसरात्र खूप मेहनत केली. विविध बचावाच्या पर्यायांवर काम केलं आणि त्यानंतर हे यश मिळालं आहे.

हे खूपच गंभीर संकट होतं आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचा अनुभव आला. ज्या लोकांचा जीव वाचला त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. हे जीव वाचवण्यात ज्या भारत सरकारच्या एजन्सीजनं काम केलं. तसेच सर्व आपले इंजिनिअर्स रात्रंदिवस जोखीम पत्करुन जे काम केलं त्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो.

या घटनेनं आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. यानंतर आता आपण बोगद्याचं सेफ्टी ऑडिट करणार आहोत. तसेच अधिक चांगल्या टेक्नॉलॉजीसह कशा प्रकारे जास्तीत जास्त चांगलं काम करु शकू याचाही प्रयत्न करु. हिमालयाची स्थिती अधिकच धोकादायक असते त्यामुळं स्वाभाविकच तिथं काम करणं कठीण असतं. पण आपल्याला त्यावरही तोडगा काढावा लागेल आणि यावर तोडगा काढूच. शेवटी मी सुखरुप घरी परतलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचं देखील अभिनंदन करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT