Uttarkashi Tunnel Rescue eSakal
देश

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी अशा प्रकारे बनवतायत छोटा बोगदा; व्हिडिओ होतोय व्हायरल

Uttarkashi Tunnel Video : मजूरांना बाहेर काढण्यासाठी एक छोटा बोगदा तयार केला जातो आहे.

Sudesh

Uttarkashi Tunnel Collapse : उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजूरांच्या सुटकेसाठी दिवस-रात्र एक करुन प्रयत्न सुरू आहेत. तब्बल 13 दिवसांपासून हे मजूर बोगद्यामध्ये अडकले आहेत. आतापर्यंत 48 मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले असून, येत्या काही तासांमध्ये हे मजूर बाहेर येण्याची शक्यता आहे.

मजूरांना बाहेर काढण्यासाठी एक छोटा बोगदा तयार केला जातो आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 800 mm पाईप टाकून, त्याच्या मदतीने मजूरांना बाहेर काढण्यासाठी बोगदा केला जातो आहे. संजय त्रिपाठी नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

कशामुळे थांबलंय काम?

गुरुवारीच हा पाईप पुढे नेऊन मजूरांची सुटका करण्यात येणार होती. मात्र या पाईपपुढे लोखंडाचा दुसरा एक पाईप आल्यामुळे अडथळा निर्माण झाला. हा पाईप वाकडा झाल्यामुळे त्याला कापल्यानंतर पुन्हा ड्रिलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मशीनमध्ये ऑगर पाठवून पुन्हा नवीन भाग वेल्ड करण्यात येईल. यानंतर पुढील पाच मीटरपर्यंत कोणताही अडथळा नसल्याचं ग्राउंड पेनेट्रेशन रडारमुळे स्पष्ट झालं आहे.

कशी होणार सुटका?

या छोट्याशा पाईपमधून एखादी व्यक्ती केवळ रांगतच बाहेर येऊ शकते. छोटा बोगदा तयार झाल्यानंतर एनडीआरएफचे जवान आतमध्ये जाणार आहेत. त्यानंतर एक-एक करुन सर्व मजूरांना चाकं असणाऱ्या स्ट्रेचरवर झोपवून बाहेर पाठवलं जाईल. याचा व्हिडिओ देखील NDRF ने शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT