Uttarkashi Tunnel Rescue 
देश

Uttarkashi Tunnel Rescue: 7 दिवसांपासून जगण्यासाठी धडपड, मजूर बोगद्यातून कधी बाहेर येणार? ऑगर मशीनने आतापर्यंत काय केलं?

Sandip Kapde

Uttarkashi Tunnel Rescue:  उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. बोगद्यात खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑगर मशीनच्या माध्यमातून कामगारांचे प्राण वाचविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ड्रिलिंगच्या मदतीने 25 मीटरपेक्षा जास्त पाईप टाकण्यात आले आहेत. यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन सेवा, वैद्यकीय सेवा आणि पोलिसांनी मिळून मॉक ड्रील केले जात आहे.

24 मीटरचा ढिगारा काढण्यात बचाव कर्मचाऱ्यांना यश आले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी 60 मीटर पर्यंतचा ढिगारा काढावा लागेल. सध्या नवीन बोरिंग मशीनची प्रतीक्षा आहे. हे बोअरिंग मशिन इंदूरहून आणले जात असून, ते सायंकाळी उशिरा जॉली ग्रँट विमानतळावर उतरले आहे. ती तीन ट्रकमधून आणली जात आहे. दुपारपर्यंत हे मशीन ऑपरेशनच्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित आहे. सध्या गेल्या 32 तासांपासून संपूर्ण बचावकार्य थांबवण्यात आले आहे. ड्रिलिंग दरम्यान खडकांमुळे मलबा बचाव पथकाच्या दिशेने पडत आहे.

ड्रिलिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्येही तांत्रिक समस्या येत आहेत.मशिनचे बेअरिंग खराब झाले आहे, त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही आणि पुन्हा पुन्हा वर येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज अतिरिक्त ऑगर ब्लेड इंदूरहून बचाव स्थळी पोहोचले. आज बोगद्यासमोरील आडवे ड्रिलिंग करून कामगारांना बाहेर काढण्यात यश आले नाही, तर डोंगराच्या माथ्यावरून उभ्या ड्रिलिंगद्वारे बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. (Latest Marathi News)
 
उत्तराखंड सरकार बचाव कार्याशी संबंधित प्रत्येक क्षणाची माहिती पंतप्रधान कार्यालयाशी शेअर करत आहे. बोगद्यातील सुरक्षेची जबाबदारी आयटीबीपी आणि एनडीआरएफकडे सोपवण्यात आली आहे. उत्तराखंड पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बोगद्याच्या बाहेर मॉक ड्रिल करत आहेत.

उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, वैद्यकीय पथके आणि इतर आपत्ती प्रतिसाद पथकांद्वारे मॉक ड्रिल केले जात आहेत आणि गरज पडल्यास आपत्कालीन उपाय केले जात आहेत.

बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना वेळोवेळी अन्न, पाणी आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तसेच त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी नियमित बोलणे करण्यात येत आहे.

अमेरिकन ऑगर मशीन एका तासात 5 मीटरपर्यंत ड्रिलिंग करण्यास सक्षम आहे. मात्र, मध्येच खडक आल्याने ड्रिलिंगमध्ये अडचणी येत आहेत. ढिगाऱ्यात ड्रिलिंग केल्यानंतर पाईप आत टाकणे, अलाइनमेंट बसवणे आणि वेल्डिंग करणे यासाठी दीड ते दोन तास लागतात. एकूण सुमारे 60 मीटर खोदकाम करायचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Kolhapur Politics : मुश्रीफांची सून बिनविरोध झाल्यानंतर मंडलिक अॅक्शनमोडवर सगळ्या उमेदवारांना केलं गायब, कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

'सोलापुरातील ॲड. राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ'; न्यायाधीशासमोर दोन साक्षीदारांची महत्त्वाची साक्ष..

SCROLL FOR NEXT