School Bus Accident Sakal
देश

School Bus Accident : विरूद्ध दिशेने येणाऱ्या स्कूल बसला कार धडकली; 6 जणांचा जागीच मृत्यू

ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दत्ता लवांडे

लखनऊ : उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथे स्कूल बस आणि एका कारचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून बसचालकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक माहितीनुसार, बसमध्ये सीएनजी गॅस भरून बसचालक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येत होता. त्यावेळी मेरठ कडून येत असलेल्या TUV कारने या स्कूल बसला जोराची धढक दिली. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.

बसचालकाला ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसमध्ये शाळकरी विद्यार्थी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी दुर्दैवाने तब्बल ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

Samsung Galaxy S24 Ultra मोबाईलवर चक्क 70 हजारचा डिस्काउंट; प्रीमियम ऑफर पाहा एका क्लिकवर

Political Astrology : अजित पवारांच्या मागची साडेसाती कधी संपणार? या महिन्यात होणार मोठा राजकीय बदल, जाणून घ्या भविष्य....

Asia Cup, IND vs PAK: मोदींना शेवटची संधी होती..उद्धव ठाकरे खवळले, महिला शिवसैनिक पंतप्रधानांना सिंदूर पाठवणार!

Latest Marathi News Updates : कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT