Crime News esakal
देश

Crime News : ज्यूस पाजून उझबेकिस्तानच्या महिलेवर बलात्कार; आरोपीनं बनवला अश्लील व्हिडिओ

आरोपी हा महिलेच्या मित्राचा लिव्ह इन पार्टनर असून तो सध्या पोलिसांच्या (Delhi Police) ताब्यात आहे.

सकाळ डिजिटल टीम

तरुणानं तिला पिण्यासाठी ज्यूस दिल्याचा आरोप आहे. ज्यूस प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तरुणानं तिच्यावर बलात्कार केला.

नवी दिल्ली : आपल्या मुलाच्या उपचारासाठी उझबेकिस्तानमधून (Uzbekistan Women) दिल्लीत आलेल्या महिलेला ज्यूसमध्ये मादक पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आलीये.

आरोपीनं बलात्काराचा व्हिडिओही बनवला. तसंच याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. केएन काटजू मार्ग पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

आरोपी हा महिलेच्या मित्राचा लिव्ह इन पार्टनर असून तो सध्या पोलिसांच्या (Delhi Police) ताब्यात आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेनं सांगितलं की, माझ्या मुलाला अनेक वर्षांपासून डिस्कचा त्रास होत होता. 2019 मध्ये त्याच्यावर उपचार करण्यासाठी मी भारतात आली होती.

पीडितेसोबत तिची आईही आली होती. डॉक्टरांनी महिलेच्या मुलाला काही महिने हॉस्पिटलमध्ये ठेवलं. मुलाची तब्येत बरी झाल्यावर त्यांनी मुलाला आईसह उझबेकिस्तानला पाठवलं. यानंतर ती उझबेकिस्तानमधून आली आणि दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या लोकांसोबत राहू लागली. तिथं ती घरगुती नोकर म्हणून काम करत होती.

दरम्यान, 5 मार्चला तरुणानं तिला पिण्यासाठी ज्यूस दिल्याचा आरोप आहे. ज्यूस प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तरुणानं तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. यानंतर त्यानं याविषयी कोणाला सांगितलं तर हा व्हिडिओ अनेक ठिकाणी प्रसारित करू, अशी धमकी दिली. कसंबसं तिनं हिंमत करुन पोलिसात तक्रार केली. केएन काटजू मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून तपास सुरू केला असून सध्या आरोपी फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Shirur News : थंडावा शोधताना काळाचा घाला; कवठे येथे मुलांसोबत पोहायला गेलेल्या वडिलांचा बुडून मृत्यू

Waste Management Project : कचरा प्रकल्पातून आर्थिक नुकसान टाळा; विरोधीपक्ष नेत्यंची आयुक्तांकडे मागणी

Bridge Collapse : आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, दोषींवर कारवाईची मागणी

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

SCROLL FOR NEXT