vaccination_ 
देश

मोठी बातमी! 45 वर्षांपुढील सर्वांना लस, लसीकरण्याच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही राज्यात तर कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील पाच राज्यात एकूण कोरोनाबाधितांपैकी जवळपास ८० टक्के रुग्ण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. देशात १ एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. या टप्प्यात ४५ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. याआधी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षांपुढील असाध्य आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांना लस दिली जात होती. पण, आता तिसऱ्या टप्प्याच सरसकट ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्प्या टप्प्या सुरु करण्यात आला. याअंतर्गत  ६० वर्षांवरील व्यक्ती आणि ४५ वर्षांपुढील असाध्य आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना लस दिली जात होती. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने तरुणांनाही लस दिली जावी, अशी मागणी होती. पण, केंद्राने आता ४५ वर्षांपुढील व्यक्तींचा लसीकरणात समावेश करण्यात निर्णय घेतला आहे. 

भारतामध्ये कोरोना महामारीची प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. दरदविशी कोरोना रुग्णांच्या संख्या नवा विक्रम प्रस्थापीत करत आहे. आरोग्य मंत्रायलानं मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनं थोडाफार दिलासा दिला. मात्र, सहा राज्यातील कोरोना रुग्णांची होणारी वाढ देशाची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू यासारख्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह सहा राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देशातील एकूण नव्या रुग्णांपैकी ८४ टक्के इतकी आहे.  या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लोकांच्या चिंतेत भर पडत आहे. 

भारतामध्ये सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून झपाट्यानं रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दररोजच्या वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं गतवर्षीचा विक्रमही मोडीत काढला आहे.  गुजरातमधील आजच्या आकडेवारीनेही नवीन विक्रम प्रस्थापीत केले आहेत. पुन्हा एकदा कोरोना महामारीनं आपला प्रादुर्भाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील महत्वाच्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. तर काही राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT