Corona Vaccine 
देश

लसीकरण@ 24x7; केंद्राचा निर्णय, वेळेची मर्यादा हटविली

पीटीआय

नवी दिल्ली - देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता सरकारने आता लसीकरणासाठी घालण्यात आलेली वेळेची मर्यादा काढून टाकली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. लोक आता त्यांच्या सोयीनुसार दिवसभरामध्ये कधीही लस घेऊ शकतील, लोकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या वेळेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तितकेच महत्त्व देतात, असेही हर्षवर्धन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेमध्ये या नव्या बदलाचा तपशील जाहीर केला. या लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घालण्यात आलेली मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. या वेळेनंतर देखील लसीकरण करायचे की नाही याचा निर्णय रुग्णालयांना घ्यायचा आहे, असे ते म्हणाले. को-विन २.० या ॲपवर  लसीकरणाच्या वेळेचा कोणताही तपशील दिलेला नाही. ही कालमर्यादा आता काढून टाकण्यात आली आहे. एखाद्या रुग्णालयाची तशी क्षमता असेल आणि यंत्रणाही परवानगी देत असेल सायंकाळी पाचनंतर देखील लसीकरण केले जाऊ शकते फक्त त्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून परवानगी घेणे आवश्‍यक आहे, असेही भूषण यांनी नमूद केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Mumbai Crime: घात की अपघात? विक्रोळीत हत्या झालेले घर जळून खाक, प्रकरणाला नवे वळण

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी सकाळीच केली पोस्ट; जाणून घ्या काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT