Covid Vaccination for youth and old people
Covid Vaccination for youth and old people 
देश

12 ते 14 वयाच्या मुलांना लस, ६० वर्षांवरील सर्वांना मिळणार 'बूस्टर'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात आता १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होणार असून ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी 'बूस्टर डोस'लाही (Booster dose) मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं येत्या १६ मार्चपासून या सर्वांसाठी नवा लसीकरण कार्यक्रम सुरु होणार आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडवीय (Mansukh Mandviya) यांनी ही माहिती दिली. (Vaccination for children between ages of 12 and 14 and precaution dose for above 60 years will start from March 16)

मांडविय यांनी ट्विट करुन सांगितलं की, "मुलं सुरक्षित तर देश सुरक्षित. मला सांगायला आनंद होतोय की, १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु होत आहे. त्याचबरोबर ६० वर्षांवरील सर्व नागरिक आता प्रिकॉशनरी डोस अर्थात बूस्टर डोस घेऊ शकतील. त्यामुळं माझं मुलांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी लस जरुर घ्यावी"

मुलांना कोणती लस मिळणार?

दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी हैदराबादस्थित बायोलॉजिकल इव्हॅन्स (Biological Evans) या फार्मा कंपनीनं बनवलेली 'कॉर्बोव्हॅक्स' ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं आपल्या निवेदनात दिली आहे.

दरम्यान, सध्या भारतात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरु आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांना इतर गंभीर आजार आहेत अशांना तसेच फ्रन्ट लाईन वर्कर्सना सध्या बूस्टर डोस दिला जात आहे. पण आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार, ६० वर्षांवरील सर्वच ज्येष्ठांना सरसकट 'बूस्टर डोस' घेता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT