देश

बारा वर्षांवरील मुलांना मिळणार लस; 'झायडस कॅडीला'ला DCGI कडून मंजूरी

विनायक होगाडे

नवी दिल्ली : झायडस कॅडिलाला आज ZyCoV-D साठी DCGI कडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या करोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोविड 19 साठी जगातील पहिली आणि भारताची स्वदेशी विकसित डीएनएवर आधारित लस आहे. ही लस वय 12 वर्षे आणि त्यावरील मुले आणि प्रौढांना दिली जाईल. याबाबतची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे. भारतात वापरली जाणारी सहावी लस ठरणार आहे.

काय आहे ही लस?

या लसीची भारतात सर्वांत मोठी चाचणी घेतली गेली होती. ५० हून अधिक केंद्रांवर या लसीची चाचणी घेण्यात आली होती. याप्रकारे एखाद्या भारतीय कंपनीने तयार केलेली जगातील पहिलीच डीएनएवर आधारित असलेली लस आहे. हा दावा झायडसने केला आहे. या लसीचे तीन डोस द्यावे लागणार आहेत. अहमदाबादमधील फार्मास्युटिकल कंपनी असेल्या झायडस कॅडिलाने १ जुलै रोजी जॉयकोव्ह-डी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितली होती. देशात आतापर्यंत सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT