Vadodara Boat Capsize Incident 
देश

Vadodara Boat Capsize Incident: 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

गुजरातमधील वडोदराजवळील हरणी तलावात काल (गुरुवार) बोट उलटली. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १२ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे.

Sandip Kapde

Vadodara Boat Capsize Incident

गुजरातमधील वडोदराजवळील हरणी तलावात काल (गुरुवार) बोट उलटली. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १२ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या बोटीत एका खासगी शाळेचे २७ विद्यार्थी होते.

बोटीची क्षमता १४ लोकांची होती परंतु २७ पेक्षा जास्त लोक बोटीवर होते. PMNRF मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देणार आहे. (Gujarat News)

दरम्यान १२ विद्यार्थी आणि २ शिक्षकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी ९ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक होते असे सांगण्यात येत आहे. तसेच, कोणालाही लाईफ जॅकेट घालण्याची सक्ती करण्यात आली नाही. बोट पलटी होताच घटनास्थळी गोंधळ झाला. बोटीतील मुले आणि इतर लोक मदतीसाठी आवाज देत होते. माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेक मुले बुडाली होती. (Latest Marathi News)

सुटका करण्यात आलेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गुजरातचे मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. तसेच डीएमकडून १० दिवसांत अपघाताचा अहवाल मागवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census: जनगणनेत जात सांगणं अनिवार्य नाही! देशात पहिल्यांदाच डिजिटल सेन्सस; ११ हजार ७१८ कोटी मंजूर

TAIT Exam 2025: भावी शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी! TAIT परीक्षेतील २,२०७ उमेदवारांचे निकाल रद्द

Pregnancy Prep 2026: पुढच्या वर्षी प्रेग्नेंसी प्लॅन करताय? मग 2025 संपण्याआधीच बदला 'या' ५ महत्त्वाच्या सवयी

Viral Video: देशाच्या पहिल्या डॉनची मुलगी त्रस्त; मोदी आणि शहांकडे न्यायाची मागणी, काय घडलं? पाहा भावनिक व्हिडिओ व्हायरल

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३९४६ मतदान केंद्रांची तयारी; प्रत्येक ९०० मतदारांसाठी एक केंद्र

SCROLL FOR NEXT