देश

दुसऱ्यांचा जीव वाचवायच्या नादात डॉक्टरनं गमावले प्राण! नेटकऱ्यांनी म्हटलं ते तर देवदूत

सकाळ वृत्तसेवा

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने त्यांच्या गावामध्ये शोककळा पसरली आहे.

उत्तर प्रदेश : कोरोना काळात(corona) दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा केलेले डॉ. अरुण यांचा वैष्णोदेवी( vaishno devi) येथे झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये सापडून मृत्य झाला. डॉ. अरुण यांचे एका महिन्यापूर्वीच लग्न झाले होते आणि ते उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे रुग्णांची सेवा करत होते. वैष्णोदेवी येथील चेंगराचेंगरी मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याने नेटकऱ्यांनी त्यांना देवदूत असे संबोधले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने त्यांच्या गावामध्ये शोककळा पसरली आहे. (vaishno devi stampede gorakhpur doctor death)

अरुण यांचे वडील सत्य प्रकाश सिंह यांनी सांगितले की ,२९ डिसेंबर रोजी अरुण आणि त्यांची पत्नी वैष्णोदेवी चे दर्शन करण्यासाठी गेले होते . रात्री त्यांनी जेव्हा मंदिराच्या गुहेत प्रवेश केला तेव्हा अरुण यांच्या हातात इलेट्रॉनिक घड्याळ असल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही म्हणून ते घड्याळ जमा करण्यासाठी बाहेर आले आणि तिथे झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये सापडून त्यांचा मृत्य झाला. त्यांचे लग्न हे 01 डिसेंबर रोजी झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी माध्यमांकडून मिळाली. अरुण सिंह यांची पत्नी डॉ. अर्चना सिंह या सुद्धा पतीच्या पार्थिवासोबत लखनऊ विमानतळावर पोहचतील आणि त्यांचे पार्थिव तिथून त्यांच्या गावी गोरखपूर येथे आणले जाईल.

मित्रांसोबत गेले होते वैष्णोदेवीला...

अरुण यांचे मित्र डॉ. अतुल जायस्वाल यांनी सांगितले की, अरुण माझा अत्यंत जवळचा मित्र असून, आम्ही सर्व शिक्षण एकत्रित च पूर्ण केलेले आहे. या झालेल्या घटनेत उत्तर प्रदेश मधील सहारनपूर जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. त्यासोबतच साल्लाहपुर गावातील विनीत सहगल आणि धर्मवीर यांनी देखील या घटनेत आपला प्राण गमावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT