Vande Bharat Express News esakal
देश

Railway : मोदींनी उद्घाटन केलेल्या 'एक्सप्रेस'ला म्हशींची धडक; म्हशींच्या मालकाविरुध्द गुन्हा

मणिनगर स्टेशनजवळ म्हशींचा एक कळप रेल्वे रुळावर आला होता.

सकाळ डिजिटल टीम

मणिनगर स्टेशनजवळ म्हशींचा एक कळप रेल्वे रुळावर आला होता.

Vande Bharat Express News : मुंबईहून अहमदाबादकडं (Mumbai Ahmedabad) जाणाऱ्या वंदे भारत सेमी हाय स्पीड एक्सप्रेसला (Vande Bharat Express) गुरुवारी सकाळी अपघात झाला. हा अपघात खूपच विचित्र असा होता. मणिनगर स्टेशनजवळ (Maninagar Station) म्हशींचा एक कळप रेल्वे रुळावर आला होता. यातल्या म्हशींना या एक्सप्रेसनं धडक दिली होती. यामुळं वंदे भारत एक्सप्रेसच्या इंजिनाकडील भागाची एक शीट निखळली होती.

दरम्यान, रेल्वेपटरी आणि स्टेशनच्या परिसरात जनावरांना आणण्यास मनाई असताना या म्हशी थेट ट्रेनवर येऊन धडकल्या. यामुळं आता म्हशींच्या मालकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वटवा रेल्वे स्टेशनचे (Vatva Railway Station) पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सांगितलं की, रेल्वेच्या हद्दीत घुसखोरी करणं आणि रेल्वेच्या संपत्तीचा गैरवापर करणं याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी म्हशींचा मालक कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीय.

वंदे भारत या सेमी हायस्पीड एक्सप्रेसला झालेल्या अपघातात इंजिनाकडून नाकासारख्या दिसणाऱ्या भागाचं नुकसान झालं होतं. या भागाची मुंबई सेंट्रल इथं दुरुस्ती करण्यात आली आहे. या अपघातात या एक्सप्रेसच्या इंजिनाकडून भागाची एक शीट निखळली होती. ही शीट पुन्हा बसवण्यात आलीय. या अपघातात ट्रेनच्या अंतर्गत यंत्रणेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंर ही एक्स्प्रेस 1 ऑक्टोबर पासून सुरु झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT