Vande Bharat Express esakal
देश

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात आढळली बुरशी, फोटो व्हायरल, रेल्वेनं दिलं हे उत्तर

Vande Bharat Express: डेहराडूनहून दिल्लीच्या आनंद विहारला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये खराब जेवण दिल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Sandip Kapde

Vande Bharat Express: डेहराडूनहून दिल्लीच्या आनंद विहारला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये खराब जेवण दिल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासोबतच एका प्रवाशाने ती सोशल मीडियावरही शेअर केली. वंदे भारत ट्रेनमधील एका प्रवाशाने जेवणात दिल्या जाणाऱ्या दह्यामध्ये बुरशीची लागण झाल्याचा दावा केला आहे.

हर्षद टोपकर या प्रवाशाने आपली तक्रार रेल्वे मंत्रालय, उत्तर रेल्वे आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अधिकृत खात्यांना टॅग करून पोस्ट केली. ५ मार्च रोजी हर्षदच्या तक्रारीनंतर भारतीय रेल्वेने त्याच्या पोस्टला उत्तर दिले. (Latest Marathi News)

आज मी एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये वंदे भारत ते डेहराडून ते आनंद विहार असा प्रवास करत होतो. सर्व्ह केलेल्या दह्यामध्ये हिरवा थर आढळून आला. वंदे भारत सेवेकडून अशी अपेक्षा नाही, असे हर्षदने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे सेवेच्या अधिकृत खात्याने हर्षदला त्याच्या प्रवासाचे तपशील शेअर करण्यास सांगितले जेणेकरून ते या प्रकरणाची चौकशी करू शकतील. उत्तर रेल्वेने देखील हर्षदच्या पोस्टला प्रतिसाद दिला आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या अधिकृत खात्याला टॅग केले, "कृपया या प्रकरणाची नोंद घ्या." (Latest Marathi News)

अलीकडच्या काळात अनेक वंदे भारत प्रवाशांनी ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत तक्रारी केल्या आहेत. जानेवारीमध्ये, वंदे भारत एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते वाराणसी असा प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आरोप केला होता की प्रवासादरम्यान मला आणि इतरांना शिळे जेवण देण्यात आले होते. गेल्या महिन्यात, एका प्रवाशाच्या जेवणात मृत झुरळ आढळले होते, त्यानंतर IRCTC ने या मुद्द्यावर माफी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT