vande bharat express File Photo
देश

Vande Bharat: 'वंदे भारत'ची सुरु होणार सुपरफास्ट पार्सल सेवा; पहिल्यांदा धावणार दिल्ली-मुंबई मार्गावर

वंदे भारत ट्रेनसाठी ही नवी सेवा लवकरच सुरु होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वेगवान प्रवासासाठी भारतीय रेल्वेनं सुरु केलेल्या 'वंदे भारत ट्रेन'नं आता वेगवान पार्सलची सेवाही सुरु करणार आहे. दिल्ली-मुंबई या मार्गावर पहिल्यांदा ही सेवा पुरवणारे 'वंदे भारत' ट्रेन धावणार आहे. गुरुवारी रेल्वे मंत्रालयानं ही माहिती दिली. (Vande Bharat freight services to launch soon It will run first time on Delhi Mumbai route)

या नव्या वंदे भारत ट्रेनमार्फत काही विशेष प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यात येणार आहे. वंदे भारतच्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आलेल्या फ्रेट ईएमयू रोलिंग स्टॉक मार्फत ही सेवा देण्यात येणार आहे. या ट्रेनची पहिली खेप लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या ट्रेनची पहिली सेवा दिल्ली-एनसीआर-मुंबई या भागात सुरु होणार आहे. पुढील तीन आठवड्यांत निश्चित करण्यात आलेल्या टर्मिनलवर आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत.

फ्रेट ईएमयू रॅकमध्ये काय विशेष?

ट्रेनची गती क्षमता - १६० किमी प्रतितास

मालवाहतुकीसाठी खास पॅलेटाईज्ड कंटेनर डिझाईन

१८०० मीमी रुंद स्वयंचलित स्लाईडिंग प्लग दरवाजे

पॅलेटच्या योग्य हँडलिंगसाठी लॉकिंग व्यवस्था तसेच रोलर फ्लोअर सिस्टिम

तापमान नियंत्रणासाठी एसी कंटेनरची व्यवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT