Vande Bharat Train Fire Video Sakal
देश

Vande Bharat Train Fire Video : वंदे भारत ट्रेनच्या बॅटरी बॉक्सला आग; अग्निशामक जवानांच्या तत्परतेमुळे धोका टळला

अग्निशामक दलाच्या जवानांकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

दत्ता लवांडे

भोपाळ : मध्य प्रदेश येथील कुरवई केथोरा रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून तत्परतेने आग विझवली आहे अशी माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

अधिक माहितीनुसार, कुरवई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसून ही आग फक्त बॅटरी बॉक्सपुरतीच मर्यादित होती. चाचणीनंतर ट्रेन पुन्हा रवाना केली जाणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

दरम्यान, वंदे भारत ट्रेन ही सुपरफास्ट ट्रेन म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली होती. त्यानंतर तिचे अनेक ठिकाणी किरकोळ अपघात झाले होते. यामध्ये जनावरे जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. तर वंदे भारत ट्रेनच्या एका डब्यात पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये या ट्रेनच्या बॅटरी बॉक्सला आग लागल्याची घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT