Vantara Project Video Series  esakal
देश

Vantara Project : आले वनताराचे सुपरस्टार.. ! प्राण्यांना मिळाला सेलिब्रिटींचा आवाज, पाहा गौरीची कहाणी

Championing Wildlife Preservation: वनतारामधील प्राण्यांना मिळणार सेलिब्रिटींचा आवाज,ज्ञान अन् मनोरंजनाने भरलेली व्हिडिओ सीरीज होणार रिलीज

सकाळ डिजिटल टीम

Championing Wildlife Preservation:  

 नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या अनंत अंबानी यांना वन्यजीवांबद्दल प्रेम आपुलकी आहे. त्यामुळेच त्यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये वनतारा प्रोजेक्ट सुरू केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत आजारी वन्यजीवांची काळजी घेतली जाते. तसेच, वन्यजीवांप्रती जनजागृतीही केली जात आहे.

या प्रकल्पाअंतर्गत आता ‘वनतारा के सुपरस्टार्स’ या व्हिडिओ सीरीज सुरू करण्यात येणार आहेत. हे व्हिडिओ ज्ञान आणि मनोरंजन करणारे ठरणार आहेत. या व्हिडिओची खास बात म्हणजे हे व्हिडिओ काही भारतीय सेलिब्रिटींच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात येणार आहेत. वनताराचे सुपरस्टार हे फक्त वनताराच्या प्रोजेक्टमध्ये राहणारे प्राणी नाहीत तर नैसर्गिक जगाचे ब्रॅण्ड अँबॅसिडर आहेत. म्हणजेच, मुक्या प्राण्यांचा आवाज हे व्हिडिओ बनणार आहेत

या सीरीजमधील पहिला व्हिडीओ हा वंतारा प्रकल्पात आलेली पहिली हत्तीण गौरी हिच्यावर करण्यात येणार आहे. गौरी ही हत्तीण राजस्थानमधील रस्त्यांवर सापडली होती. ती नुकतीच जन्मलेली होती. जन्मावेळीच ती कुपोषित होती. तसेच तिला संधिवातासारखा गंभीर आजारही होता. तसेच, गौरीची दृष्टी जन्मताच कमी होती.

गौरीला वनतारामधील डॉक्टरांनी योग्य ते उपचार केले. गौरी सध्या सर्वांचीच आवडती बनली आहे. ती जामनगरमधील राधे कृष्णा ट्रस्ट जिथे २०० च्या वर हत्तींची सेवा केली जाते. तिथे जाणारी पहिली हत्तीण ही गौरी होती. त्यानंतर तिच्यात खूप बदल झाला.  (Vantara Superstars)

वनतारा प्रकल्पात हत्तींची काळजी घेतली जाते

वन्यजीवांसाठी सर्जनशील असा प्रोजेक्ट भारतात पहिल्यांदाच राबवला गेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्राण्यांबद्दल जनजागृती करणे हा या व्हिडिओचा महत्त्वाचा उद्देश आहे. ज्यामुळे, आपल्या नैसर्गिक जगाचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावर जोर देणे. ही व्हिडिओ सीरीज सर्व वयोगटांच्या लोकांना डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आली आहे. केवळ डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणाऱ्याच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी ही सीरीज उपयुक्त ठरणार आहे.

गौरीची स्टोरी ही वनतारा प्रोजेक्टमधील एक परिवर्तनवादाची गोष्ट आहे. जी वन्य जगताला एक नवी आशा देणारी ठरली आहे.  गौरीच्या व्हिडिओसाठी प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांना आवाज दिला आहे.  

या व्हिडिओत गौरी सापडली कशी, तिच्यावर काय उपाय केले. तिचा सांभाळ कसा केला जातो. आणि इतर गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. नीना यांनी हा व्हॉईस ओव्हर इतका सुरेख रंगवला आहे की स्वत: गौरी हत्तीणच आपल्याशी बोलतेय असं भासतं.

गौरीचा दिनक्रम कसा असतो, ती काय खाते, कशी राहते. तिचा नवतारामधील प्रवास हे सर्वच या व्हिडिओत सांगितले आहे. गौरीच्या मैत्रिणी कोण आहेत, तिचे माहूत कोण आहेत. तसेच, तिला कशी थेरपी दिली जाते हे सर्वच या व्हि़डिओत सांगण्यात आले आहे.

या प्रोजेक्टच्या व्हिडिओ सीरीजबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, वनतारा प्रोजेक्टच्या या व्हिडिओ सीरीजमध्ये गौरी या हत्तीणीला आवाज देण्याचा अनुभव वेगळा होता. या Edutainment व्हिडिओंद्वारे, वनतारा केवळ प्राण्यांच्या कथा सांगत नाही तर वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृतीही करत आहे.

या आगळ्या-वेगळ्या प्रकल्पाचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली, याचा मला अभिमान आहे, असेही नीना गुप्ता म्हणाल्या.

वनताराची ही व्हिडिओ सीरीज ज्ञान आणि मनोरंजनासाठी तसेच दर्शकांमध्ये वन्यजीव जागरुकता वाढवण्यासाठी बनवण्यात आलेली आहे. या प्रकल्पातील प्रत्येकाने पृथ्वीवरील मौल्यवान जैवविविधता जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

आजवर इंग्रजी भाषेत प्राण्यांबद्दलचे व्हिडिओ बनवले गेले आहेत. तसेच, भारतातील वन्यजीव कमी प्रमाणात चर्चेत आले आहेत. पण, आता या सिरिजमुळे जगभरातील प्राण्यांसाठीही जनजागृती केली जाणार आहे. हाच या व्हिडिओ सिरिजमागील महत्त्वाचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT