Terrorist Waliullah sentenced to death Terrorist Waliullah sentenced to death
देश

वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरण : दहशतवादी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

गाझियाबाद :१६ वर्षे जुन्या वाराणसी साखळी बॉम्बस्फोट (bombing case) प्रकरणातील आरोपी मोहम्मद वल्लीउल्ला याला गाझियाबाद न्यायालयाने सोमवारी (ता. ६) एका प्रकरणात फाशी तर दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बॉम्बस्फोट मालिकेतील दोन प्रकरणांमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी शनिवारी (ता. ४) दहशतवादी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते तर एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. (Terrorist Waliullah sentenced to death)

वाराणसीतील संकट मोचन मंदिर संकुलात झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या दहशतवादी वलीउल्लाला एका हत्येच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर २६ जण जखमी आणि अपंग झाले होते. त्याचवेळी दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब टाकून बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आरोपी वल्लीउल्लाला शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले होते. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांनी बनारसमधील संकट मोचन मंदिरात झालेल्या स्फोटात वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते. येथे बॉम्बचा स्फोट होऊन सात जणांचा मृत्यू झाला होता. दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडल्या (bombing case) प्रकरणीही जिल्हा न्यायाधीशांनी वल्लीउल्लाला दोषी ठरवले होते.

मोहम्मद वलीउल्ला याला सोमवारी कडेकोट बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी, जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशानुसार न्यायालय संकुलाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. बॉम्ब व श्वान पथकाकडून न्यायालयाच्या परिसरात कसून झडती घेण्यात आली.

काय आहे प्रकरण?

७ मार्च २००६ रोजी वाराणसीतील (Varanasi) संकटमोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाले होते. याशिवाय दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडला आहे. या बॉम्बस्फोटात (bombing) अनेक जण ठार झाले, तर डझनभर जखमी झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण गाझियाबाद येथे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले. फिर्यादीच्या वतीने जीआरपी कँट स्फोटात ५३, संकट मोचन स्फोटात ५२ आणि दशाश्वमेध घाट प्रकरणात ४२ साक्षीदार हजर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT