देश

Varanasi: ज्ञानवापी मशिदीच्या कार्बन डेटिंगची याचिका वाराणसी न्यायालयाने फेटाळली

हिंदू पक्षाकडून कार्बन डेटिंग करण्याची मागणी केली होती

सकाळ डिजिटल टीम

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणात सापडलेल्या 'शिवलिंगा'ची कार्बन डेटिंग करण्याबाबत गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज वाराणसी न्यायालय या प्रकरणावर निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हिंदू पक्षाकडून कार्बन डेटिंग करण्याची मागणी केली होती. ही मागणी वाराणसी न्यायालयाने फेटाळली आहे.

कार्बन डेटिंग म्हणजे काय?

एखाद्या वस्तूचे वय आणि वेळ ठरवण्याच्या पद्धतीला कार्बन डेटिंग म्हणतात. कार्बन डेटिंगला रेडिओ कार्बन डेटिंग असेही म्हणतात. कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये C-14 नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचं अणू वस्तुमान 14 इतकं असतं. हा कार्बन रेडिओऍक्टिव्ह असतो. आणि जशी जशी सदर वस्तू नष्ट होते. त्याप्रमाणे हा कार्बनही कमी होतो. यावरून एखाद्या धातूचे आणि सजीव प्राण्याचे वय ठरवलं जातं.

मात्र, शिवलिंग हा दगड आहे. धातूमध्ये कार्बनचं प्रमाण असते. दगडामध्ये कार्बन नसतो. त्यामुळे दगडाचं कार्बन डेटिंग करणं शक्य नाही. मात्र, शिवलिंगाची स्थापना करताना धातूचा वापर केला जातो. यावरून याचे वय ठरवण्यास मदत होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

काय आहे प्रकरण?

वाराणसी येथील शंकराच्या मंदीराशेजारी एक ज्ञानव्यापी मशीद आहे. ज्ञानवापीमधील श्रृंगार गौरीची पूजा करण्यास परवानगी देण्यासाठी पाच हिंदू महिलांनी एक याचिका दाखल केली होती. पण या मशिदीच्या अंजुमन इंतजामिया कमेटीने या महिलांच्या याचिकेला आव्हान दिले होते. मात्र, समितीने न्यायालयात प्रार्थनास्थळ कायदा 1991 चा संदर्भ देत यावर सुनावणी घेण्यास विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास परवानगी दिल्याने सध्या यावर सुनावणी होणार आहे.

देणार आहे. पाच महिलांनी या संदर्भात वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात 11 ऑक्टोबरला न्यायालय निर्णय देणार होते. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT