Varun Gandhi Latest News
Varun Gandhi Latest News Varun Gandhi Latest News
देश

Varun Gandhi : तरुणांच्या भवितव्याशी किती खेळणार? पेपरफुटीवरून गांधी संतापले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अधीनस्थ सेवा निवड आयोगाने रविवारी घेतलेल्या महसूल लेखापाल भरती २०२२च्या मुख्य परीक्षेत कॉपी (Paper Leak) केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद सुरू आहे. पेपरफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक हल्लाबोल करीत आहेत. या प्रकरणावर विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी स्वतःच्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘उत्तर प्रदेश पोलिस, यूपीपीसीएल, यूपीएससी, ट्यूबवेल ऑपरेटर, पीईटी, यूपीटीईटी, बीएड, एनईईटी आदींमध्ये पेपर लीकच्या प्रकरणानंतर आता कॉपीचे प्रकरण महसूल लेखापाल परीक्षेत दिसून आले आहे. संघटित शिक्षण माफिया तरुणांच्या भवितव्याशी किती काळ खेळत राहणार? हे अत्यंत दुर्दैवी आहे.’ असे ट्विट भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही या प्रकरणावरून राज्यातील भाजप सरकारला घेरले होते. ‘आज लेखापाल भरती परीक्षेचा पेपरही लीक (Paper Leak) झाला होता. आता असे दिसते की उमेदवारांचा आरोप खरा आहे की ही सर्व भाजप सरकारची चाल आहे. जेणे करून कोणतीही परीक्षा पूर्ण होऊ नये आणि लोकांना नोकऱ्या मिळू नये. म्हणजे तरुण भांडवलदारांसोबत मजूर-शिपाई बनून राहतील. भाजप पगार आणि पेन्शनच्या विरोधात आहे’, अखिलेश यादव म्हणाले होते.

२१ जणांना अटक

उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने (एसटीएफ) रविवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या महसूल लेखापालाच्या भरती परीक्षेतील उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेणाऱ्या २१ जणांना अटक करण्यात आली. पकडलेल्या लोकांमध्ये बिहारमधील रहिवासी, सोल्व्हर यांचा समावेश आहे. प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षानेही लेखापाल भरती परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा दावा केला आहे.

ब्लूटूथद्वारे कळविले उत्तरे

एसटीएफच्या प्रयागराज युनिटने म्होरक्या विजय कांत पटेल, साथीदार दिनेशकुमार यादव व सोनू कुमार यांना अटक केली आहे. पटेलने महसूल लेखापाल परीक्षेतील सात उमेदवारांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतले. उमेदवारांना ब्लूटूथ इअर बड्स आणि ब्लूटूथ डिव्हाइसेस देऊन डिव्हाइस चालू ठेवण्यास सांगितले. सर्व प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना ब्लूटूथद्वारे वेगवेगळ्या मोबाईलवरून कळविली गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT