asunder-raje-manvendra-singh-fight-30759
asunder-raje-manvendra-singh-fight-30759 
देश

भाजपच्या संस्थापकांचा मुलगा लढणार भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : राजस्थान कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचे असा निर्धार केलेल्या कॉंग्रेसने एक मोठा डाव टाकला आहे. भाजपच्या हेविवेट मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात याच पक्षाचे माजी मंत्री जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे झालडपाटन विधानसभा मतदारसंघाकडे राजस्थानचे नव्हे तर देशाचे लक्ष असेल.

माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जसवंतसिंग यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. वाजपेयी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. परराष्ट्रमंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. कालांतराने केंद्रात मोदी सरकार आले आणि राजकारणाची समीकरणेच बदलून गेली. काही निष्ठावंत दुखावले गेले. त्यामध्ये जसवंतसिंह, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आदींचा समावेश होता. राजस्थानमध्ये भाजप अडचणीत असल्याचे दिसून येताच भाजपच्या काही नेत्यांनी कोलांटउड्या मारल्या आहेत. कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांनी गेल्याच महिन्यात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना विधानसभेचे तिकीट देण्याचे आश्वासनही पक्षाने दिले होते. त्यानुसार त्यांना मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात मैदानात उतरविले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये 'कॉंटे की टक्कर' होण्याची शक्‍यता आहे. वास्तविक 2003 पासून वसुंधराराजे येथून निवडून येत आहेत. त्यांचा आजपर्यंत पराभव झालेला नाही. यावेळी, मात्र सिंह यांच्या रुपाने मोठे आव्हान उभे राहिले. 

जसवंतसिंह यांना 2014 मध्ये बाडमेरमधून तिकीट देण्यास पक्षाने नकार दिला होता. त्यामुळे ते नाराज होते. आपल्या पिताश्रीचा झालेल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी मानवेंद्रसिंह यांनी थेट कॉंग्रेसमध्येच प्रवेश केला आहे. पक्षाने तिकिट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मात्र, ते पराभूत झाले होते. 

मानवेंद्रसिंह यांनी पत्रकारांना सांगितले, की खरेतर मला लोकसभेची निवडणूक लढवायची होती. तशी विनंती पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली होती. मात्र, मला थेट मुख्यमंत्र्याविरोधात मैदानात उतरविले आहे. मी लढणार आहे. मुख्यमंत्र्यांचे आव्हान मी स्वीकारले आहे. राजस्थानात असलेल्या राजपूत समाज जसवंतसिंह यांना मानणारा आहे. स्वाभिमानाची लढाई मी लढणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT