vasundhara raje reaction after reading bhajanlal sharma name as new rajasthan cm goes viral watch video  
देश

चिठ्ठी उघडताच वसुंधरा राजेंच्या चेहऱ्याचा उडाला रंग! मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतरचा Video Viral... काय घडलं नेमकं?

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

रोहित कणसे

राजस्थानचे मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार हा सस्पेन्स आता संपला आहे. भाजपने पुन्हा एकदा सर्वांना चकीत करत पहिल्यांदाच निवडणूकीत विजय मिळवून आमदार झालेले भजनलाल शर्मा यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे.

फोटो सेशन दरम्यान शेवटच्या ओळीत उभे राहिलेल्या भजनलाल शर्मा यांचं नाव जेव्हा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आलं तेव्हा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मोठा धक्का बसला. कारण निवडणूकांमध्ये मिळालेल्या विजयानतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोपवलं जाईल याबद्दल त्यांना ठाम विश्वास होता. मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांनी दिल्लीचा दौरा देखील केला होता.या पार्श्वभूमीवर वसुंधरा राजे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये वसुंधरा राजे एक चिठ्ठी उघडून बघताना दिसत आहेत. त्या चिठ्ठीतला मजकूर वाचून त्यांना बसलेला धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्या प्रश्नार्थक नजरेने केंद्रीय पर्यवेक्षक राजनाथ सिंह यांच्याकडे पाहाताना दिसत आहेत. दावा केला जात आहे की याच चिठ्ठीतून राजे यांना नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव त्यांना सांगण्यात आलं . ज्याच्या नावाचा प्रस्ताव वसुंधरा राजे यांनी विधीमंडळाच्या बैठकीत मांडला होता.

राजस्थानात भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची रेस सुरू झाली. यामध्ये वसुंधरा राजे आघाडीवर होत्या, या शर्यतीत सीपी जोशी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, बाबा कमलनाथ, दीया कुमारी इत्यादी नेत्यांची नावे होती. मात्र यामधून कुठेच चर्चेत नसलेले भजनलाल शर्मा यांचे नाव समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

भजनलाल शर्मा यांचे नाव विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आलं तेव्हा वसुंधरा राजे यांचा चेहरा पडल्याचे पाहायला मिळाले, त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. यावेळी त्या भावूक देखील झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान वसुंधरा राजे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT