देश

गुजरातवरील 'वायू' संकट तूर्त टळले

पीटीआय

अहमदाबाद/नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेल्या "वायू' या चक्रीवादळाने त्याची दिशा बदलली असून, ते आता गुजरातला धडकण्याची शक्‍यता कमीच असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तूर्तास जरी हे वायू संकट टळले असले, तरीसुद्धा राज्य सरकारने मात्र त्याचा धोका कायम असल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारने किनारी भागातील तीन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले असून, किनारी भागातील विमानतळेही बंद करण्यात आली असून, रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यात हायऍलर्ट जारी करण्यात आला असून, तो शुक्रवारपर्यंत कायम राहणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्यंतरी या चक्रीवादळाने खूप उग्र रूप धारण केले होते, यामुळे गुरुवारी दुपारी गुजरात किनाऱ्यावर सोसाट्याच्या वाऱ्यासह तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. 

किनाऱ्याला स्पर्श 

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार हे वादळ वेरावेलपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून, ते आता उत्तर आणि वायव्य दिशेकडे वळेल, ते सौराष्ट्राच्या किनाऱ्याला घासून जाईल. या वादळाची दिशा हळूहळू बदलत असल्याचे अहमदाबादेतील हवामान केंद्राचे अतिरिक्त संचालिका मनोरमा मोहंती यांनी सांगितले. हे वादळ आता सौराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकणार नसून गीर सोमनाथ, जुनागढ, पोरबंदर, देवभूमी द्वारका हे जिल्हे आणि दिवू या केंद्रशासित प्रदेशाला याचा फटका बसणार आहे. 

समांतर वाटचाल 

हे सगळे वादळ गुजरातमध्ये शिरणार नाही, पण त्याच्या अर्ध्या भागाचा किनारी भागाला फटका बसेल, अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. किनारी भागांत या वादळाचा वेग दुपारपर्यंत हा 155-146 कि.मी प्रतितास ते 180 किलोमीटर प्रतितास एवढा राहण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हे वादळ समुद्रामध्ये राहणार असून, त्याची वाटचाल गुजरात किनाऱ्याला समांतर अशी होईल. 

तीव्रता कमी नाहीच 

वादळाचा मुख्य केंद्रबिंदू हा किनाऱ्याला धडकण्याची शक्‍यता कमीच असली, तरीसुद्धा त्याची तीव्रता मात्र काही कमी झालेली नाही, त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण तयारी केली असल्याचे राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकजकुमार यांनी सांगितले. पुढील 48 तास हे राज्यासाठी महत्त्वाचे असतील, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, वादळामुळे अद्याप कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT