Venkaiah Naidu sakal
देश

Venkaiah Naidu : उपराष्ट्रपतीपदापर्यंतचा नायडूंचा प्रवास अनुभवसंपन्न; पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

‘शेतकऱ्याचा मुलगा ते देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद आणि त्याहीपुढे देशाचे उपराष्ट्रपतीपद हा व्यंकय्या नायडू यांचा प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध ठरला आहे,’

पीटीआय

हैदराबाद - ‘शेतकऱ्याचा मुलगा ते देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद आणि त्याहीपुढे देशाचे उपराष्ट्रपतीपद हा व्यंकय्या नायडू यांचा प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध ठरला आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केले.

माजी उपराष्ट्रपती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकावरील प्रकाशन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले, या निमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. नायडू यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नायडू यांनी आणीबाणीच्या काळात भोगलेल्या तुरुंगवासाचा उल्लेखही केला. ‘काँग्रेसने लादलेली आणीबाणी म्हणजे राज्यघटनेला लांच्छन लावण्याचा प्रयत्न होता. या काळात नायडू हे देखील आणीबाणीविरोधातील लढ्यात सहभागी झाले होते इतकेच नव्हे तर त्यांनी त्यासाठी १७ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला होता.’

नायडू यांचे जीवनचरित्र सांगणारे पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. ‘हे पुस्तक लोकांना देशसेवेसाठी मार्गदर्शक ठरेल,’ असे प्रतिपादनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

शेतकऱ्यांसाठी तळमळ

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात व्यंकय्या नायडू हे पक्षातील वरिष्ठ नेते असल्याने त्यांना कोणतेही मंत्रिपद मिळणे शक्य होते, मात्र त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालय मागून घेतले, कारण त्यांच्या मनात ग्रामीण जनतेची, शेतकऱ्यांची आणि गरिबांची सेवा करण्याची नितांत तळमळ आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT