Pravin Togadia
Pravin Togadia esakal
देश

भाजप सत्तेत असताना भोंगे का हटवले नाहीत, VHP च्या माजी अध्यक्षांनी हिंदुत्ववाद्यांचे कान टोचले

ओमकार वाबळे

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न पेटला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केल्यानंतर हा मुद्दा राजकीय पटलावर गाजतोय. येत्या तीन तारखेपर्यंत त्यांनी अल्टिमेटमही दिला आहे. सध्या राज्य सरकार आणि गृहमंत्रालयात यासंदर्भात चर्चा सुरू आहेत. आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची देखील बैठक होणार आहे. त्यानुसार सध्या राज्यात राजकारण पेटलं आहे.

दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी भोंग्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत भाजपलाच प्रतिप्रश्न केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार भोंग्यांबाबत न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपचे राज्य असताना भोंगे का हटवले नाहीत, असा प्रश्न तोगडीया यांनी उपस्थित केला आहे.

आताही ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे, त्या राज्यात भोंगे का हटवले जात नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन नियमानुसार कोणतीही कारवाई होत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

मोहन भागवत यांनी 15 वर्षात अखंड भारत होईल, असं म्हटलं होतं. त्यांचं स्वागत आणि समर्थन करत असल्याचं तोगडीयांनी स्पष्ट केलं. मात्र सत्ता मध्ये असताना वचन दिलं जातं. सत्ता आणि सेना असताना काहीही करता येतं.

काय म्हणाले तोगडीया?

एका महिन्यात काश्मीरी पंडितांसोबत राहा.

Pok मध्ये संघाच्या शाखा लावा. मी स्वतः शाखेत नमस्ते 'सदा वस्तले' करायला येईल.

पाकिस्तानमध्ये घुसा आणि मोहन भागवत स्वतः टॅंक घेउन जा. मी स्वतः ते टॅंक स्वच्छ करीन

पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल तर हिंदूंनी सावधान असले पाहिजे

आम्ही कोणासाठी गोळी खाऊन कोणाला सत्ता भोगू देऊ नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''मी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसलो तरी...'' अरविंद केजरीवाल थेटच बोलले

MS Dhoni CSK vs RR : चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर... राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

IPL 2024 CSK vs RR Live Score : चेन्नईने राजस्थानला दिले दोन धक्के;

Sanjay Raut Nashik Daura : प्रचाराला आले अन् प्रदर्शनात रमले संजय राऊत

SCROLL FOR NEXT