Venkaiah Naidu
Venkaiah Naidu 
देश

'जयपूर फूट'ने उघडली भविष्याची कवाडे

निरंजन आगाशे

हनोई : मोटारीच्या धडकेने तीन वर्षांपूर्वी पाय गमावलेल्या सात वर्षांच्या व्हिएतनामी मुलाला "जयपूर फूट' बसविण्यात आले; तेव्हा त्याच्या डोळ्यांतील चमक पाहून येथील भारतीय दूतावास कार्यालयातील सारे उपस्थित भारावून गेले. युद्धात जायबंदी झालेल्या दोन सैनिकांसह एकूण सहा जणांना कृत्रिम पाय बसविण्यात आले; तो प्रत्येक क्षणही असाच सभोवताल उजळवून टाकणारा ठरला.

भारत सरकारतर्फे "इंडिया फॉर ह्युमॅनिटी' या कायर्क्रमांतर्गत महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त येथे कृत्रिम अवयव प्रत्यारोपण मोहीम हाती घेण्यात आली. जगभरात ही मोहीम राबविण्यात "भगवान महावीर विकलांग साह्यता समिती'ने मोठा वाटा उचलला आहे. व्हिएतनामच्या क्वांग डिंग प्रांतातील 500 जणांना या मोहिमेचा लाभ झाला. त्यापैकी सहा जणांना या कार्यक्रमात सध्या व्हिएतनाम दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते "जयपूर फूट' प्रदान करण्यात आले. उच्च तंत्रज्ञानाधारे तयार करण्यात आलेले हे कृत्रिम पाय अतिशय हलके व लवचिक आहेत, अशी माहिती "भगवान महावीर विकलांग साह्यता समिती'चे आंतरराष्ट्रीय संचालक सतीश सी. मेहता यांनी दिली.

ही संस्था जगभरात गेली अनेक वर्षे हा कल्याणकारी कार्यक्रम राबवीत आहे. जगातील ही सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना "वसुधैव कुटुंबकम' या भावनेने काम करीत आहे, अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी संस्थेचा गौरव केला. वेगळ्या क्षमता असलेल्या व्यक्तींना संचारक्षम करणारा आणि प्रतिष्ठित जीवन देणारा हा उपक्रम आहे, असे भारताचे येथील राजदूत पर्वतनेनी हरीश यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपतींनी व्हिएतनामचे राष्ट्रनायक हो चि मिन्ह यांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT