Vice Presidential election on August 6 
देश

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक सहा ऑगस्टला

६ ऑगस्टला निकालही येतील

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची औपचारिक घोषणा झाली आहे. निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ६ ऑगस्टला मतदान होईल. त्याच दिवशी निकालही येतील.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पाच जुलैला औपचारिक अधिसूचना निघेल. १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर २० जुलैला अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै असेल. सहा ऑगस्टला निवडणूक होईल. त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही सभागृहातील खासदार आणि सर्व विधानसभांच्या आमदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. मात्र उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये केवळ संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार मतदान करतात. विशेष म्हणजे राष्ट्रपती नियुक्त खासदारांनाही या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे.

उमेदवारीवरून मोर्चेबांधणी

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून उपराष्ट्रपतिपदासाठी अल्पसंख्याक चेहरा पुढे केला जाऊ शकतो असे कयास बांधले जात आहे. तर, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी ऐक्याची हाक देणाऱ्या प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने उपराष्ट्रपतिपदासाठी मात्र आपला उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारी चालविल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card e-KYC: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या करता येणार ई-केवायसी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

Neha Bora: 'CJPच्या आंदोलनाशी माझा संबंध नाही'; नेहा बोरा यांचा दिल्ली उच्च न्यायालयात दावा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT