keral-air-india.jpg
keral-air-india.jpg 
देश

केरळमधील एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेचे पाहा व्हिडिओ

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा केरळच्या कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाला असून यामध्ये पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने विमानाला आग लागली नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

रनवे वर उतरताना विमानाचे दोन तुकडे झाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना ही घटना घडली. आयएक्स १४४ या विमानाने १९१ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

करिपूरमधील कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीसीजे) येथे झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि अग्निशमन दलाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बचाव आणि वैद्यकीय सहाय्य यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले आहेत. 

केरळमध्ये दिवसभरातील ही दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचा कोझिकोड येथे झालेल्या अपघातात समोरचा भाग फुटला असून यामध्ये पायलटचा मृत्यू झाला आहे. तसेच बरेच प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने विमानाला आग लागली नाही., अशी माहिती के.जे. अलफोन्स यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT