Seema Haider Esakal
देश

Video: CAA लागू होताच, सचिनच्या आनंदाला राहिली नाही 'सीमा'; मिठाई वाटली, फटाके फोडले; मोदी-योगींचं कौतुकही थांबेना

केंद्र सरकारनं आज नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएचं नोटिफिकेशन काढून हा कायदा देशभरात लागू केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आज नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएचं नोटिफिकेशन काढून हा कायदा देशभरात लागू केला. पण यामुळं पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह भारतात दाखल झालेली सीमा हैदरला सर्वाधिक आनंद झाला आहे.

मोदींच्या या निर्णयासाठी तिनं जल्लोष केला असून मिठाईचं देखील वाटप केलं आहे. यामध्ये तिच्यासोबत तिचा पती सचिन मीना देखील होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Video CAA is implemented in india Seema Haider distributed sweets admiring of Modi Yogi)

व्हिडिओमध्ये सीमा हैदर आणि सचिन मीना आपल्या चार मुलांसह मोदींचं या निर्णयासाठी आभार मानताना दिसत आहेत. नोयडा इथल्या आपल्या घरी कुटुंबासह तिनं आनंदोत्सव साजरा केला. तिनं म्हटलं की, आम्ही खूपच आनंदी आहोत. भारत सरकारला आम्ही धन्यवाद देतो. पंतप्रधान मोदींनी जे वचन दिलं होतं ते करुन दाखवलं आहे. (Marathi Tajya Batmya)

यामुळं आता आमच्या नागरिकेच्या अडचणीही लवकरच सुटतील. यावेळी तिनं मोदींच्या आणि योगींच्या नावे घोषणाबाजीही केली. तसेच या आनंदाच्या क्षणी आम्ही रसगुल्ले वाटत आहोत. तसेच फटाके देखील फोडणार आहोत, असंही सीमा हैदरनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT