Drones formation_Republic Day Celebration 
देश

Video : आकाशात साकारल्या आकृती; डोळ्याचं पारणं फेडणारी कलाकृती पाहाच

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची ओळख दाखवणाऱ्या या आकृत्यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या कलात्मकतेला नक्कीच दाद द्याल.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाचा देशभरात सध्या मोठा उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाजवळील विजय चौकात यंदा ड्रोन्सद्वारे आकाशात अतिशय कलात्मक पद्धतीनं डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. याचा व्हिडिओ एएआयनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कलात्मकतेला नक्कीच दाद द्याल. (Video Eye popping replicas of drones at Vijay Chauk take a look)

प्रजासत्ताकदिनी रात्रीच्या काळोखात आकाशात ड्रोन्सला बसवलेल्या एलईडी लाईट्सद्वारे विविधरंगी आकृती साकारण्यात आल्या. यामध्ये भारताचा नकाशा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, युद्ध स्मारक, मेक इन इंडियाचा सिम्बॉल यांसारख्या विविध आकृतींचा समावेश होता. खुल्या आकाशात एकामागून एक दिसणाऱ्या या दृश्यामुळं उपस्थितांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला.

आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या उत्सवात यंदा अनेक बदल करण्यात आले. यापूर्वी हा उत्सव २४ जानेवारीपासून सुरु व्हायचा पण यावेळी त्यात बदल करुन तो २३ जानेवारी या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनापासून सुरु करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यंदाच्या राजपथावरील संचलनादरम्यान अवकाशात चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या नव्या राफेल लढाऊ विमानातून आकाशातून दृश्ये कशी दिसतात याचे नव्या तंत्रज्ञानाद्वारे चित्रिकरण करण्यात आलं आणि त्याचं थेट प्रसारणी झालं. Drones formation on Republic Day Celebration

त्याचबरोबर इंडिया गेट इथं गेल्या पन्नास वर्षांपासून तेवत असलेल्या अमर जवान ज्योतीचं राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलिनिकरण करण्यात आलं. त्याचबरोबर महात्मा गांधी यांची आवडती धून असलेल्या 'एबाईड विथ मी' बिटिंग रिट्रिटमधून रद्द करण्यात आलं, मात्र यावरुन मोठा गदारोळ झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT