punjab 
देश

Video: अंडे चोरणाऱ्या पोलिसाला घडली अद्दल

कार्तिक पुजारी

चंदीगड (Chandigarh)- अंडे चोरल्याप्रकरणी (stealing eggs) पंजाबमधील एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित (Punjab cop suspended) करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस एका गाड्यावरील अंडे चोरत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसाचे नाव प्रितपाल सिंग असून त्यांची पोस्टिंग पंजाब फतेगड साहेब पोलिस स्टेशनमध्ये होती. पंजाब पोलिसांनी ट्विट करुन या पोलिसाला निबंलित करण्यात आल्याचं सांगितलंय. (video goes viral Punjab cop suspended for stealing eggs in Chandigarh)

पंजाब पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, एक व्हिडिओ व्हायरल होत होता, ज्यात फतेगड साहेब पोलिस स्टेशनमधील HC प्रितपाल सिंग रस्त्यावरील एका गाडीमधून अंडी चोरताना कॅमेरामध्ये दिसत आहेत. यावेळी गाडीचा मालक कुठेतरी गेला होता. प्रितपाल सिंग आपल्या खिशामध्ये अंडे ठेवताना दिसत आहेत. त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात चौकशी सुरु करण्यात आली आहे.

प्रितपाल सिंग अंडे चोरत असताना एकाने याचे व्हिडिओ शुटींग केले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजेडात आले. सिंग आजुबाजूला पाहात अंडे चोरुन आपल्या खिशामध्ये ठेवतात. काहीवेळाने गाडीचा मालक त्याठिकाणी येतो. यावेळी सिंग काहीही न घडल्यासारखं दाखवत तेथून निघून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

Chandrakant Patil on Jayant Patil : सांगली-पेठ रस्ता न करणारे ‘शक्तिपीठ’ महामार्गावर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांचा घेतला समाचार

SCROLL FOR NEXT