Manjamma Jogati 
देश

Video : मंजम्मा जोगतींना पद्मश्री प्रदान; राष्ट्रपतींचे मानले आभार!

राष्ट्रपती भवनात झालं पुरस्कारांचं वितरण

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जोगम्मा घराण्याच्या ट्रान्सजेंडर लोकनृत्यांगणा आणि कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या ट्रान्सवुमन मथा बी मंजम्मा जोगती यांनी मंगळवारी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मंजम्मा जोगती यांनी पारंपारिक पद्धतीने राष्ट्रपतींना आशीर्वाद दिले. याचा व्हिडिओ एएनआयनं ट्विट केला आहे.

कोण आहेत मंजम्मा जोगती?

जोगती नृत्य, जनपद गीत आणि इतर कलाप्रकार टिकवून ठेवण्यासाठी मंजम्मा जोगती या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये जोगती नृत्य आणि जनपद गीतांची परंपरा अजूनही सुरु आहे.

मंजम्मा जोगती यांना सन २००६ मध्ये कर्नाटकातील जनपद अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर सन २०१० मध्ये कर्नाटक सरकारच्यावतीनं त्यांचा वार्षिक कन्नड राज्योत्सव पुरस्कारानं गौरवही करण्यात आला आहे. ही कला आणि संस्कृती शिकून तिचं संवर्धन करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या समाजाला केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT