jyotiraditya-scindia 
देश

ज्योतिरादित्य म्हणाले, काँग्रेसला मतदान करा

पीटीआय

भोपाळ - काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपवासी झालेले आणि सध्या मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी प्रचारसभांचा धडाका लावलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी एका सभेत लोकांना काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन केले. त्यांच्या या भाषणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

मध्य प्रदेशात तीन नोव्हेंबरला विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. ग्वाल्हेरमधील दाबरा गावात भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांच्यासाठी प्रचार करताना ज्योतिरादित्य म्हणाले की, ‘दाबरामधील माझ्या मतदारांनो, तुमचा हात वर करा, शिवराजसिंह चौहान आणि मला पटवून द्या की तुम्ही तीन नोव्हेंबरला ‘हाता’समोरचेच बटन दाबाल.’ त्यांच्या या वाक्यावर सगळे अवाक झाले. मात्र, ज्योतिरादित्यांनी तातडीने आपल्या वाक्यात सुधारणा करत ‘कमळ’ चिन्हाच्या समोरील बटन दाबण्याची विनंती लोकांना केली. मात्र, या चुकीचा फायदा काँग्रेसने  उठवला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT