Pirates
Pirates 
देश

Video: व्यापारी जहाजावर कब्जा करणारे 35 समुद्री चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात; नौदलानं राबवली होती मोठी मोहिम

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : अरबी समुद्रात भारतीय हद्दीतील एका व्यापारी जहाजाला बंदी बनवलेल्या सोमालियाच्या ३५ समुद्री चाच्यांना भारतीय नौदलानं कोंडीत पकडलं होतं. तसेच त्यांना समर्पण करण्यासाठी भाग पाडलं होतं. या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज नौदलानं त्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. याचा व्हिडिओ देखीलसमोर आला आहे. (video mumbai police hand over 35 pirates who captured merchant ships at arabian sea)

एएनआयच्या माहितीनुसार, सीमा शुल्क आणि इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३५ सोमालिया समुद्री चाच्यांना नौदलानं मुंबई पोलिसांच्या हवाली केलं. १६ मार्च रोजी नौदलानं हे अँटी पायरसी ऑपरेशन केलं होतं. (Latest Marathi News)

नौदलाच्या INS कोलकातानं या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतलं होतं. या सर्व चाच्यांना मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये आणण्यात आलं आहे. याच ठिकाणी त्यांचा ताबा मुंबई पोलिसांकडं देण्यात आला. (Marathi Tajya Batmya)

नौदलाची मोहिम काय होती?

भारतीय नौदलानं भारतीय समुद्र किनाऱ्यापासून १४०० नॉटिकल माईलवर असलेल्या एका व्यापारी जहाजावर कब्जा करणाऱ्या ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना आत्मसमर्पणाशिवाय कुठलाही पर्याय ठेवला नव्हता. त्यानंतर नौदलाच्या जवानांनी या जहाजावरील १७ चालक दलाच्या सदस्यांची सुखरुप सुटका केली होती. (Latest Marathi News)

नौदलानं आपल्या पी-८१ कोस्टगार्ड विमान, फ्रन्टलाईन जहाज, आयएनएस कोलाकात आणि आयएनएस सुभद्रा आणि मानवरहित विमान तैनात केलं होतं. या मोहिमेसाठी सी-१७ विमानातून खास मार्कोस कमांडोंना जहाजावर उतरवण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT