dirty dance 
देश

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Young woman dirty dance: दिल्ली मेट्रो प्रवासाशिवाय इतर गोष्टींसाठीच वापरलं जातंय की काय! अशी शंका घेण्यास वाव आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्ली मेट्रो प्रवासाशिवाय इतर गोष्टींसाठीच वापरलं जातंय की काय! अशी शंका घेण्यास वाव आहे. कारण, दररोज दिल्ली मेट्रोमधील चित्र-विचित्र व्हिडिओ समोर येत असतात. दिल्ली मेट्रोमध्ये कोणी अश्लील चाळे करताना दिसतं, कोणी अश्लील डान्स करतं, भांडणं होतात, कोणी रील्स बनवतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक तरुणीचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये तरुणी महिलांच्या डब्यामध्ये बेधुंद होऊन कथित अश्लील डान्स करताना दिसत आहे. तरुणी एका व्हिडिओमध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तरुणी हिंदी गाण्यावर डान्स करत आहे. ती डान्स करताना कोणीतरी तिचा व्हिडिओ काढत असल्याचं समजतं.

तरुणी महिलांच्या डब्यात होती. काही महिला प्रवासी त्याठिकाणी होत्या. त्यावेळी अचानक तरुणी डान्स करायला सुरुवात करते. ती एका ठिकाणाहून दुसरीकडे पळत जाते आणि कथित अश्लील स्टेप्स करण्यास सुरुवात करते. अन्य महिला प्रवासी तिच्याकडे आश्चर्याने पाहात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही तिच्याकडे पाहून हसतात देखील.

काही दिवसांपूर्वी दोन तरुणी दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील डान्स करताना पाहायला मिळाल्या होत्या. याची दखल पोलिसांनी घेतली होती. दोन्ही तरुणींवर पोलिसांनी कारवाई केली होती. आता या नव्या व्हिडिओवर देखील पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. व्हिडिओमध्ये तरुणी क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे.

अनेक तरुण-तरुणींना सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचं वेड लागलं आहे. शिवाय आपल्या रील किंवा व्हिडिओला चांगले व्ह्युज आणि लाईक मिळावेत यासाठी ते काहीही करायला मागे-पुढे पाहात नाहीत असं चित्र आहेत. ताजा व्हिडिओ त्यातलाच एक म्हणावा लागेल. दिल्ली मेट्रोमध्ये रील्स बनवण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. पण, याकडे अनेक कथित रील्स स्टारच दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT