priests of temple Esakal
देश

Viral Video: हरिद्वारमधील काली मंदिराच्या पुजाऱ्यांचे रौद्र रुप, पाठलाग करत भाविकांना काठीने बेदम मारहाण; जाणून घ्या कारण

Priests of temple beating devotees: उत्तराखंडच्या हरिद्वारमधील सिद्धपेठ श्री दक्षिण काली मंदिरातील हा व्हिडिओ आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांना आपण शांत, संयमी समजतो. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात पुजाऱ्यांचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधील सिद्धपेठ श्री दक्षिण काली मंदिरातील हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये पुजारी आणि मंदिराचे कर्मचारी भाविकांना काठीने मारहाण करत असल्याचं दिसत आहे.(video of the priests of temple beating devotees with sticks)

मंदिराचे पुजारी आणि कर्मचारी काही भाविकांना काठीने बेदम मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्किंग तिकीटावरुन भाविक आणि पुजारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. (Haridwar Siddhpeeth Shri Dakshin Kali Mandir)

उत्तर प्रदेशातील सहारणपूरमधून आलेले काही भाविक आक्रमक झाले होते. पार्किंग तिकीटवरुन हा वाद निर्माण झाला होता. प्रत्युत्तर म्हणून पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनी भाविकांना काठ्याने जबर मारहाण केली. व्हिडिओमध्ये दिसतंय की पुजाऱ्यांच्या हातामध्ये काठ्या आहेत. पाठलाग करुन भाविकांना बेदम मारहाण केली जात आहे.

मारहाण सुरु झाल्यानंतर भाविकांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पुजारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण सुरुच ठेवली. हा सर्व प्रकार काहीवेळ असाच सुरु होता. घटनेची माहिती मिळताच चंडी घाटचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मारहाणीमध्ये अनेक भाविक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर भाविकांनी मंदिर परिसर सोडला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनाकडून भाविकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : पुण्यात शाळेत चोरी, चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत कैद

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT