देश

Bullet Train : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडीओ रिलीज; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला नेत्रदीपक Video

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद येथील साबरमती येथे उभारण्यात आलेल्या मल्टिमॉडल ट्रान्स्पोर्ट हव येथील पहिल्या बुलेट ट्रेन ट्रर्मिनलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद येथील साबरमती येथे उभारण्यात आलेल्या मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब येथील पहिल्या बुलेट ट्रेन ट्रर्मिनलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अत्याधुनिक सुविधांसह सज्ज होत असलेली ही बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई अशी धावणार आहे. सदरील रेल्वे प्रकल्प जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक सहाय्याने उभा रहात आहे. या प्रकल्पानंतर मुंबई आणि अहमदाबाद ही दोन मोठी शहरं २.०७ तासांच्या अंतराने जोडली जातील. या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३५० किलोमीटर असणार आहे.

बुलेट ट्रेनच्या ५०८ किलोमीटरच्या मार्गामध्ये समुद्राखालील मार्ग आणि बोगद्यांचाही समावेश आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १,०८,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

२०१७ मध्ये नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलेला होता. या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दिल्ली-वाराणसी, दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-नागपूर, मुंबई-हैदराबाद, चेन्नई-म्हैसूर, दिल्ली-अमृतसर हे प्रकल्प हाती घेण्याचं सरकारचं धोरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT