Rahul Gandhi Video Viral Esakal
देश

Rahul Gandhi Video Viral: 'हाय गर्मी...', राहुल गांधींनी भाषणादरम्यान डोक्यावर ओतली पाण्याची बाटली, पाहा VIDEO

Rahul Gandhi Video Viral: काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील देवरिया दौऱ्यावर आहेत, त्यावेळी भाषण करत असताना त्यांना गरम होऊ लागल्याने त्यांनी डोक्यावर पाण्याची बाटली ओतली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

कडाक्याच्या उन्हाळ्यात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीने नेत्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान आता राहिलेल्या शेवटच्या टप्प्याची जोरदार तयारी सुरू आहे. याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रॅलीत त्यांनी पाण्याने भरलेली बाटली डोक्यावर ओतल्याचे दृश्य दिसलं. ते उत्तर प्रदेशातील देवरिया येथे एका सभेला संबोधित करत होते, भाषण सुरू असताना त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केली आणि नंतर म्हणाले, 'खुप गरम आहे.' यानंतर त्यांनी संपूर्ण पाण्याची बाटली डोक्यावर ओतली.

देशातील उत्तर-पश्चिमी राज्यांमध्ये कडक ऊन आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सर्व पक्षांचे नेते रॅलींमध्ये व्यस्त आहेत. कमाल तापमान सामान्यपेक्षा ८ अंश सेल्सिअस जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते लोकांना उष्णतेपासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही देवरियाच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आणि त्यांच्या 'देवाने मला पाठवले' या वक्तव्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "...बाकी सर्व बायोलॉजिकल आहेत, पण नरेंद्र मोदी जी बायोलॉजिकल नाहीत. त्यांच्या 'देवाने' त्यांना अंबानी आणि अदानींच्या मदतीसाठी पाठवले आहे, पण 'देवाने' त्यांना शेतकरी आणि मजुरांच्या मदतीसाठी पाठवले नाही."

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "देवाने त्यांना असे पाठवले असते तर त्यांनी गरीब आणि शेतकऱ्यांना मदत केली असती. हा नरेंद्र मोदींचा देव आहे." पुढे ते म्हणाले, “काही लोक मोदींना प्रश्न विचारतात. मोदीजी, तुम्ही आंबे कसे खातात? तुम्ही धुतल्यानंतर किंवा सोलल्यानंतर खाता का? यावर मोदीजी म्हणतात की आम्ही काही करत नाही, सर्व काही आपोआप होते.

राहुल गांधी पुढे म्हणाले, "देवाने त्यांना पाठवले असते, तर देवाने तुम्हाला सांगितले असते, भारतातील सर्वात कमकुवत लोकांना मदत करा, शेतकऱ्यांना मदत करा, पण मोदीजींचा देव म्हणाला, अंबानींना मदत करा, अदाणींना मदत करा." अदानींचे 16 लाख कोटी रुपये माफ करा, तो कोणता देव आहे, तो मोदीजींचा देव आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: कच्च्या मालावर एफडीएची कारवाई! खवा, मावा, काजू, बदामसह १७.८२ टन साठा जप्त

Maharashtra Live News : भाजपमुळे आपली अवस्था चीन, रशिया, उत्तर कोरियासारखी होईल, जिथे निवडणुका कागदावरच असतात - अशोक गेहलोत

Road Accident: उरुळी कांचन येथे भरधाव कारच्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू,१६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी;कारचालकाचाही मृत्यू.

मित्रांचे मेसेज-कॉल बघून होतेय चिडचिड? सावध व्हा, तुम्ही 'फ्रेंडशिप फटीग'चे तर शिकार नाही ना? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

IPL 2027 Trade: दिल्लीच्या २८ वर्षीय फिनिशरवर गुजरात-लखनौची नजर, त्याच्यासाठी मोजणार का वेगवान गोलंदाजाची किंमत?

SCROLL FOR NEXT