mp 
देश

Video: पोलिसांची दादागिरी; मास्क न घातल्याने महिलेला मुलीसमोरच चोपलं

कार्तिक पुजारी

भोपाळ- गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा विषाणू धुमाकूळ घालत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुवून, शारीरिक अंतराचे पालन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करुन घेण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. मास्क न घातल्याने एका महिलेला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार मध्य प्रदेशात समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मारहाण करतेवेळी महिलेची मुलगीही त्याठिकाणी उपस्थित होती. (Video Woman Thrashed By Madhya Pradesh Cops Over Mask Daughter Watches)

महिला आणि महिलेची मुलगी किराणा वस्तू घेण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी महिलेने मास्क घातला नव्हता, तर मुलीने स्कार्प तोंडाला बांधला होता. यावेळी पोलिसांनी महिलेला याबाबत विचारणा केली. यावेळी झालेल्या वादातून पोलिसांनी महिलेला मारहाण केली आहे. एकाने शूट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक महिला पोलिस आणि दोन पोलिस महिलेला मारहाण करत आहेत. पोलिस महिलेला गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करताहेत, पण महिला याला विरोध करते. यावेळी पोलिस महिलेला मारहाण करतात. महिला जेव्हा रस्त्यावर पडते, तेव्हा तिच्या केसांना धरुन ओढलं जातं. यावेळी महिलेची मुलगी आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण पोलिस मुलीला जोराचा धक्का देत बाजूला करतात.

मध्य प्रदेशात पोलिसांची दादागिरी वाढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. 6 एप्रिल रोजी एकाने मास्क व्यवस्थितपणे घातला नव्हता, म्हणून पोलिसांनी जबर मारहाण केली होती. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, नियमांचे पालन करण आवश्यक आहे, पण या नियमांची अंमलबजावणी करताना पोलिसांकडून दादागिरी होत असल्याचं पाहायला मिळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधा

SCROLL FOR NEXT