Shivraj Singh Chauhan esakal
देश

Vidhansabha Election : मध्यप्रदेशचे भाजप नेते तेलंगण, राजस्थानात

मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर भाजपचे नेते आता तेलंगणाच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

वृत्तसंस्था

भोपाळ - मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर भाजपचे नेते आता तेलंगणाच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. यानुसार मध्य प्रदेश भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी तेलंगणात दाखल होत आहेत. सुमारे डझनभर नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हे सर्व नेते तेलंगणातील विविध विधानसभा मतदारसंघात तळ ठोकणार आहेत. यात अनेक मंत्री आहेत तर काही जण पदाधिकारी आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राजस्थानच्या प्रचारात सामील होणार आहेत. त्यांना स्टारप्रचारक केले आहे. राजस्थानात २५ नोव्हेंबरला तर तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी मध्य प्रदेशातील भाजपच्या २२ नेत्यांवर प्रचाराची धुरा सोपविली आहे. यात मंत्री नरोत्तम मिश्रा, विश्‍वास सारंग, अरविंद भदोरिया, आमदार रामेश्‍वर शर्मा, खासदार के.पी. यादव, खासदार अनिल फिरोजिया, मोहन यादव, यशपाल सिंह सिसोदिया, कमल पटेल आदींचा समावेश आहे.

शिवराज सिंह राजस्थानमध्ये

तेलंगणबरोबरच राजस्थानच्या प्रचाराची धुरा मध्य प्रदेशचे भाजप नेते सांभाळणार आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह राजस्थानचे स्टार प्रचारक असले तरी त्यांच्या प्रचाराचा दौरा अद्याप निश्‍चित झालेला नाही. मात्र त्यांना राजस्थानसाठी सज्ज करण्यात आले आहे. शिवराज सिंह चौहान हे आपल्या प्रचारसभांतून मध्य प्रदेशात अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देणार आहेत.

राजस्थानात २३ नोव्हेंबर रोजी प्रचार थांबणार आहे. शिवराज सिंह यांच्याव्यतिरिक्त आणखी काही नेत्यांना राजस्थानला पाठविण्यात येत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात मतदान झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT